AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनायक राऊत यांच्या सुनेच्या आरोपांवर प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले, माफ करता कामा नये…

शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यावर गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले्यानंतर, याचं पडसाद राजकारणात देखील उमटू लागले आहे. आता प्रवीण दरेकर यांनी प्रकरणावर स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

विनायक राऊत यांच्या सुनेच्या आरोपांवर प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले, माफ करता कामा नये...
गिरीजा राऊत
| Updated on: Jul 12, 2026 | 3:04 PM
Share

शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यावर सून गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहे. ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप करत अघोरी कृत्य केल्याचे देखील आरोप केले आहे. यावर आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. आता भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिवा आहे… अशा प्रकारच्या गोष्टी जे करतील त्यांनी माफ करता कामा नये… असं स्पष्ट शब्दात प्रवीण दरेकर म्हणाले आहे.

गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळींवर केलेले आरोप समोर येताच प्रवीण दरेकर म्हणाले, ‘विनायक राऊत यांच्यासंदर्भात अशा प्रकारच्या कृती पूर्वी देखील ऐकण्यात येत होत्या. पण आता घरातच ते अशा प्रकारे आपल्या सुनेलाच अशा गोष्टींना भाग पाडत असतील तर यापेक्षा दुर्दैव दुसरं असूच शकत नाही. हे केवळ घरातून आलेलं एक प्रकरण आहे, अशा प्रकारच्या गोष्टी याच्यापुढे येतीलच. अशा प्रकारची गोष्टी जे बाबा करतील त्याला माफ करता कामा नये,” अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

सुनेच्या तक्रारीनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात आरोपींपैकी दोन भोंदू बाबा असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. भोंदूबाबा फिरोज शेखला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरा भोंदूबाबा काझीच्या शोधासाठी पोलिसांची दोन विशेष पथके तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गिरीजा राऊत यांनी केलेले गंभीर आरोप

नुकताच झालेल्या एका पत्रकार परिषदेत गिरीजा राऊत म्हणाल्या, ‘मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी प्लानिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलं आहे… अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होते. मासाचे तुकडे अंगावरून उतवरत होते. तांब्याची तार उतरवत होते. कणकेच्या बाहुल्या, माझ्या अंगावरील न धुतलेले वापरलेले कपडे, डोक्याचे केस घेऊन उतारे करत होते. हळद खायला द्यायचे. अगरबत्तीची उदी तीर्थ म्हणून पेलाभरून प्यायला द्यायचे. गोमूत्र द्यायचे.’ असं देखील गिरीजा राऊत म्हणाल्या. तर विनायक राऊत यांनी सूनेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

Follow Us
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...