AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांना खोल पाण्यात का जाऊ दिलं? अकादमीची जबाबदारी होती, समुद्रात 8 विद्यार्थी बुडाल्यानंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया!

रायगडमधील दिवेआगार येथे एकूण आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. यावर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुलांना खोल पाण्यात का जाऊ दिलं? अकादमीची जबाबदारी होती, समुद्रात 8 विद्यार्थी बुडाल्यानंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया!
girish mahajanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 10:06 PM
Share

पवन येवले, टीव्ही 9 मराठी नाशिक : रायगडमधील दिवेआगार येथे एकूण आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. मुळचे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून काही विद्यार्थी सहलीला आले होते. यावेळी समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर विद्यार्थी पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेले. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आली नाही. यातच एकूण आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त केली जातेय. आम्ही प्रशासनाला सूचना केल्या आहेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय. ही घटना घडल्यानंतर आता भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी अकॅडमीची होती. मुलांना खोल पाण्यात का जाऊ दिलं, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. समुद्रात बुडालेले विद्यार्थी हे आळंदीमधील विनर्स अकॅडमी शिक्षण घेत होते.

ही घटना दुर्दैवी आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळा किंवा संस्थांना मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. जबाबदारी निश्चित केली जाईल. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित अकॅडमीचीदेखील होती. मुलांना एवढे खोल पाण्यात का जाऊ देण्यात आले? काही मुलं सुखरूप बाहेर पडली मात्र इतर बुडाली. याबाबत सखोल चौकशी जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

मयत मुलांची नावे खालीलप्रमाणे – 1) तन्मय दत्तात्रय वहीले 2) सुमित भरत अहिरे 3) प्रणव रामदास बनसोडे 4) कैवल्य सतीश वासनकर 5) राजवीर युवराज वहीले 6) यश किरण वानखेडे 7) सोहम तुकाराम भांडवलकर 8) कौस्तुभ संदीप दौंड सर्व जण वय 16 वर्षे, राहणार आळंदी, पुणे

विद्यार्थ्यांना सहलीला नेणारी अकॅडमी अनधिकृत?

दरम्यान, आळंदीतील विनर्स अकॅडमीमधली एकूण 24 मुलं सहलीला गेली होती. आता याच  स्टडी सर्कल इमारतीच्या बाहेर आळंदीतील शेकडो ग्रामस्थ एकत्र जमा झाले आहेत. येथे तणावाची स्थिती निर्माण झालीय. या इमारतीच्या बाजूला मोठा  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलायय सहल नेत असताना आयोजकांनी मोठा हलगर्जीपणा केल्याचा आरोप आळंदीकरांकडून केला जातोय. ही अकॅडमी अनधिकृत असल्याचा आरोप देखील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना