दीपके 2029 ला घेणार राजकीय स्टँड; नव्या आव्हानावर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

girish mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी अभिजीत दीपकेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. तेव्हाचं तेव्हा बघू, असे महाजन यांनी बघितलं.

दीपके 2029 ला घेणार राजकीय स्टँड; नव्या आव्हानावर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
| Updated on: Aug 02, 2026 | 3:11 PM

नवी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आंदोलनामुळे अभिजीत दीपके चर्चेत आले आहेत. आता दीपके यांनी 2029 साली राजकीय स्टँड घेणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. दीपकेंच्या भूमिकेमुळे भाजपचं टेन्शन वाढणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे हाताळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान दीपकेंच्या आगामी राजकीय स्टँडवरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे. अभिजीत दीपकेंच्या आगामी राजकीय स्टँडवरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तेव्हाच तेव्हा बघू, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तर संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना फेसबुक प्राइम मिनिस्टर म्हणून केलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. ‘कोरोनामध्ये परिस्थिती वेगळी होती. ती आणि आताची तुलना करू नका. संजय राऊत काही बोलतात, असे ते म्हणाले.

नाशिकमधील पीडित बेळे कुटुंबाच्या भेटीनंतर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘बेळे यांच्या घरी आलो होतो. त्यांचा खड्ड्यात गाडी आदळल्यामुळे तोल जाऊन अपघात झाला. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 39 दिवस त्या कोमात होत्या. त्यांचे निधन झाले म्हणून मी त्यांच्या घरी भेटीसाठी आलो. शासनाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करू. कालपासून अतिशय वेगात खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. युटीलिटीचे कामे सुरू आहे. तीन-चार महिन्यात कामे पूर्ण होतील’.

नाशिकमधील रस्ता दुरुस्तीवर महाजन म्हणाले ‘पावसामुळे कामे करता आली नाही. आम्ही वेगाने खड्डे बुजवण्याचे कामे हाती घेतली आहेत. डांबराच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. कामे सुरू आहेत, यावेळी आपण सर्व रस्ते करत आहेत. पुढेच 30 ते 40 वर्ष खड्डे होणार नाही. सुंदर शहर कार्याचे असेल, तर थोडा त्रास होईल’. नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडिओवरून महाजन यांनी टीका केली. ‘तुम्ही व्हिडिओ दाखवला पाहिजे. एका नगरसेविकांना मुलीकडून पाय धुऊन घेतले. दोन दिवस दाखवला. तर हा पण व्हिडिओ दाखवा, असे महाजन पुढे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us