AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 17 राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला असून, महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे.

IMD Weather Update : 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
IMD Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 6:41 PM
Share

महाराष्ट्रात ऑगस्टचा संपूर्ण महिना आणि सप्टेंबर महिन्याचे पहिले दोन आठवडे पावसाने दडी मारली, त्यामुळे पावसाभावी परिस्थिती गंभीर बनली आहे. पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. मात्र आता दिलासादायक बातमी म्हणजे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर पुढील 48 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, भारतीय हवामान विभागाकडून 25 सप्टेंबर रोजी देशातील 17 राज्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी, तसेच या काळात मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तब्बल 85 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचं देखील हवामान विभागाने म्हटलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वादळाचा मोठा फटका हा ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना बसणार असून, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. तसेच पर्वतीय प्रदेशा काही ठिकाणी लँडस्लाईडच्या घटना देखील घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. पूर्व भारतामध्ये पावसाचं रौद्र रूप पहायला मिळणार आहे, त्यामुळे या काळात गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

या राज्यांना हाय अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर रोजी 17 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 17 राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात देखील 25 सप्टेंबर रोजी चांगल्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे,  या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा