AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार?

Gokul Gite : नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहे. आता गोकुळ गिते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार?
Gokul gite and eknath shindeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 22, 2026 | 4:55 PM
Share

विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहे. ही जागा शिवसेनेला सुटली होती, नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आता गोकुळ गिते यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता गोकुळ गिते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेची विधान परिषदेतील ताकद आणखी वाढणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गोकुळ गिते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार नाशिक विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता गोकुळ गिते यांना आज एकनाथ शिंदे यांना भेटायला बोलवले आहे. सध्या गिते हे प्रवासात आहेत आणि काही वेळात ते नंदनवनला पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता गिते आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर गिते यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीच्या आणि शिवसेनेच्या आमदारांच्या संख्येत वाढ होणार आहे.

काय म्हणाले गिते?

आज सकाळी आमदार झाल्यावर गोकुळ गितेंच्या समर्थकांनी एकनाथ शिंदेंच्या गाण्यावर जल्लोष केला होता. गिते समर्थक एकनाथ शिंदेंच्या गाण्यावर थिरकले होते. त्यामुळे आमदार गोकुळ गीतेंच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या सुरू झाल्या होत्या. यावेळी बोलताना गोकुळ गिते यांनी म्हटले की, ‘एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केलं. मला नंदनवनवर भेटायला या असं म्हटलं आहे. मी भेटायला जातो आहे. एकातासात काय तो खुलासा करणार आहे.

कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार…

तसेच गिते यांनी म्हटले होते की, ‘कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. हा विजय जरी गोकुळ गितेंचा असला तरी या व्यक्तीमागे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांना विश्वासत घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्याशी बोलल्याशिवाय माझी भूमिका अस्पष्ट आहे, असंही गिते यांनी म्हटलं आहे. आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गिते काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप