Gokul : कोल्हापुरात ‘गोकुळ’वरून संघर्ष पेटला! सतेज पाटलांकडून आजपासून रस्त्यावरची लढाई सुरू

कोल्हापुरात 'गोकुळ'वरून संघर्ष पेटलाय. आज काँग्रेस आमदार सतेज पाटलांकडून आजपासून रस्त्यावरची लढाई सुरू आहे,

Gokul : कोल्हापुरात गोकुळवरून संघर्ष पेटला! सतेज पाटलांकडून आजपासून रस्त्यावरची लढाई सुरू
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 8:26 AM

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून संघर्ष पेटला आहे. सरकारने अध्यक्ष निवडीसाठी अतिरिक्त 4 शासन नियुक्त संचालकाच्या वाढीचा अध्यादेश काढलाय. त्यामुळे अध्यक्षपद महायुतीकडे जाणार असल्याची चर्चा आहे. या निर्णयाच्या विरोधात सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चाची हाक दिली. त्यानुसार गोकुळसाठी आज सोमवारी सतेज पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात हा मोर्चा काढला जाणार आहे.

गोकुळ दूध संघाची निवडणुकीत 25 संचालकापैकी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 13 जागांवर बाजी मारली. परंतु कोरम पूर्ण करण्यासाठी 14 संचालकांची गरज आहे. परंतु या तांत्रिक पेचामुळे समविचारी आघाडीला अध्यक्ष नेमता येईना. दुसरीकडे सरकारकडून अध्यक्ष निवडीसाठी 4 संचालकांची नियुक्ती केली जाणार आहे. आता अध्यक्ष निवडीत सरकारची एन्ट्री झाल्याने समविचारी आघाडीचं टेन्शन वाढलं. सरकारने याबाबत अध्यादेश देखील काढला. परंतु या निर्णयाला सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला विरोध दर्शवला. त्यानंतर त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

Loading...

सरकारने अध्यक्ष निवडीसाठी घेतलेल्या निर्णयाला विरोधकांनी तीव्र विरोध दर्शवला. या निर्णयाच्या विरोधात समविचारी आघाडी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह विरोधक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून एक प्रकारे शक्तीप्रदर्शन घडवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मोर्चावरून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी शंका व्यक्त केली होती. परंतु या मोर्चाला प्रचंड गर्दी होणार असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला. मुख्यमंत्र्‍यांनी ड्रोनद्वारे निरीक्षण करावे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

कसा असेल मार्ग?

गोकुळ’साठीचा हा संघर्ष मोर्चा दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे.  सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे. मोर्चाच्या निमित्ताने दसरा चौकासह शहरभरात लक्षवेधी पोस्टर लागले.  गोकुळच्या निमित्ताने राज्य सरकारने शासन नियुक्त संचालकांच्या संख्येत वाढ केल्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करणयात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us