AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्याच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात इसमाला कपडे फाटेपर्यंत मारहाण

गोंदियामधील पोलीस कर्मचाऱ्याने भर चौकात एका इसमाला बेदम मारहाण केली आहे. ओव्हरटेक करून कट मारल्याचा आरोप करत मद्यधुंद अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्याने हा प्रकार केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मद्याच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात इसमाला कपडे फाटेपर्यंत मारहाण
मारहाण करताना पोलीस कर्मचारी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 08, 2025 | 9:55 AM
Share

महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मद्याच्या नशेत एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तीने तक्रार केल्यावर गोंदिया पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मद्यपान करुन मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित केले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभाग सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत कांचन राहुले या पोलीस कर्मचाऱ्याने केलेला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर जात असताना छत्तीसगड राज्यातील सुनितकुमार मांडवी यांनी कट मारून ओव्हरटेक केल्याच्या आरोप करून त्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. कांचन राहुले याने मद्याच्या नशेत हा प्रकार केला. ही घटना ही 19 मे रोजी घडली. परंतु त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावर गोंदिया पोलिसांनी ॲक्शन मोडवर आले. पोलीस प्रशासनाने राहुले याला निलंबित केले आहे. या प्रकारचे कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय केली की जाणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांना दिली.

छत्तीसगडमधील रहिवाशी मांडवी यांनी म्हटले की, मला पोलीस कर्मचारी राहुले याने बेदम मारहाण केली. त्यासंदर्भात मी तक्रार दिली. त्यानंतर त्याचे निलंबन झाले. परंतु फक्त निलंबन करुन हा प्रकार थांबवू नये. त्याच्यावर विविध कलमांनी गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई केली पाहिजे. आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर झाल्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलीन झाली आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीतून बळतर्फ करावे, अशी माझी पोलीस विभागाकडे मागणी आहे, असे मांडवी यांनी म्हटले.

पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी सांगितले की, मद्याच्या नशेत पोलिसाने सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली. त्यासंदर्भात पोलीस शिपाई कांचन राहुले याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. पोलिसांचा तपास सुरु आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी