AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 सेकंदात 6 जणांचा जागीच मृत्यू, ट्रक-कारच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला

Gondia Accident : गोंदिया झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

10 सेकंदात 6 जणांचा जागीच मृत्यू, ट्रक-कारच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
Gondia Accident 6 DiedImage Credit source: Google
| Updated on: Sep 08, 2026 | 4:30 PM
Share

गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्री भरधाव ट्रकने एका SUV कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी झालेले सर्वजण मजूर असून ते मध्य प्रदेशातील बालाघाट येथून तेलंगणातील करीमनगर येथे कामासाठी जात होते. या अपघातामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

ट्रकची SUV ला जोरदार धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा गावाजवळ झाला. समोरून येणाऱ्या SUV ला ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की SUV चा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनातील लोकांना बाहेर काढले. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश

मृतांची ओळख किरण संतोष वैद्य (26), संतोष मात्रे (38), सुशीला मात्रे (35), रूपसेन तेजलाल सत्याकर (35), ज्योती रूपसेन सत्याकर (32) आणि तीन वर्षीय आरुष मात्रे अशी झाली आहे. हे सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर तहसीलमधील रहिवासी होते. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालक मोहसिन खान (32) याच्याविरोधात निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरातील टाऊन हॉल उड्डाणपुलावर मध्यरात्री घडलेल्या एका भीषण अपघातात 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या अपघाताचा थरारक CCTV व्हिडिओ समोर आला आहे. मित्राच्या काकूच्या अंत्यविधीवरून दुचाकीने परतताना वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गमावल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहम्मद झिशान मोहम्मद अली (वय 21, रा. खोकडपुरा, पैठण गेट) असे मयत तरुणाचे नाव आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं