“केंद्रात-राज्यात भाजप असूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का नाही”: मराठीच्या मुद्यावरून काँग्रेसने भाजपला छेडले…

| Updated on: Jan 04, 2023 | 5:19 PM

काँग्रेसच्या काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला होता. त्यावेळी भाजपकडूनही ही मागणी लावून धरण्यात आली होती.

केंद्रात-राज्यात भाजप असूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का नाही: मराठीच्या मुद्यावरून काँग्रेसने भाजपला छेडले...
Follow us on

गोंदियाः सध्या विश्व मराठी साहित्य संमेलन मुंबईमध्ये सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतमध्ये या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात उद्गघाटन करण्यात आले आहे. विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा, साहित्य, मराठी भाषिकांचा जगभरातील वावर आणि मराठी भाषेचा होणारा विकास यावर आपली मत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेबरोबर कर्नाटकमध्ये असणाऱ्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तर दुसरीकडे विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचा गवागवा होत असताना. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचेच सरकार असतानाही मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा का मिळत नाही असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे.

दोन्हीकडे भाजपचे सरकार असल्याने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून द्यावा अशी मागणीही आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा या मागणीने आता जोर धरला आहे.

आज उद्घाटन प्रसंगी मराठी भाषा, मुंबई आणि कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या प्रगतीसाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगिले होते.

त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, भाजप विरोधी पक्षात असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी करत होते. त्यानंतर आता राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार आहे. तरीही भाजपकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का देण्यात येत नाही असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेसच्या काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला होता. त्यावेळी भाजपकडूनही ही मागणी लावून धरण्यात आली होती.

त्यामुळे आता राज्यात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आता भाजपचे नेते, पदाधिकारी का करत नाहीत असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.