AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Murder : गोंदियात महिलेचा गळा चिरुन हत्या! रात्रभर श्वान पथकाने पिंजून काढलं शहर, आरोपींचा शोध सुरुच

Gondia Crime News : मृतक शिशुकला साखरे या टेलरिंगचे काम करायच्या. त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज देवरी येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते, तर दोन्ही मुले शाळेत गेली होती.

Gondia Murder : गोंदियात महिलेचा गळा चिरुन हत्या! रात्रभर श्वान पथकाने पिंजून काढलं शहर, आरोपींचा शोध सुरुच
हत्या करण्यात आलेली महिलाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Aug 18, 2022 | 8:11 AM
Share

गोंदिया : एका महिलेची गळा चिरुन हत्या (Gondia Murder) करण्यात आल्यानं गोंदियात खळबळ माजली आहे. बुधवारी ही हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे. लूटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्यांनी या महिलेची हत्या केली असावी, अशी शंका पोलिसांना (Gondia Crime News) आहे. कारण या महिलेच्या अंगावरील दागिनेही गायब असून घरातील सामानही अस्ताव्यस्त असल्याचं दिसून आलंय. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. बुधवारी रात्रभर श्वान पथकाने मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी अख्ख शहर पिंजन काढलंय. मात्र अजूनही आरोपींचा शोध लागलेला असून पोलिसांकडून कसून तपास केला जातोय. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी (Gondia Police) व्यक्त केला आहे. गोंदिया महिलेच्या हत्येनं खळबळ उडाली असून ही महिला घरात रक्ताच्या थारोळ्या पडून असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी याबाबत कळवण्यात आलं. पोलिसांच्या तपासात या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली असल्याचं उघड झालं. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलंय.

नेमकं काय घडलं?

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील पंचशील चौकामध्ये भाड्याने राहणाऱ्या महिलेचा गळा चिरुन खून करण्यात आला. बुधवारी हत्येची घटना उघडकीस आली असून शिशुकला साखरे (35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खून झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने गायब असून घरातील सामानसुद्धा अस्ताव्यस्त पसरलेले असल्याने महिलेचा खून लूटमार करण्यासाठी तर करण्यात आला नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे देवरी शहरात खळबळ उडालीय. सध्या पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान देवरित पोलिसांचे श्वान पथक दाखल झाले असून श्वान पथकाने रात्रभर अख्ख देवरी शहर पिंजून काढलंय.

कळलं कसं?

मृतक शिशुकला साखरे या टेलरिंगचे काम करायच्या. त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज देवरी येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते, तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. सायंकाळी दोन्ही मुले घरी आली तेव्हा बाहेरुन दरवाजा बंद केल्याचं दिसून आलं. अखेर दरवाजा उघडलाअसता मुलांना त्यांची आई रक्तबंबाळ अवस्थेत फरशीवर पडून दिसली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूचे शेजारी व नागरिक धावून आले.

दरम्यान या घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर व पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. गोंदियावरून श्वानपथकाला पाचारण केले आहे. घटनास्थळावरील परिस्थिती आणि खून झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याने आणि घरातील कपाट आणि इतर सामानसुद्धा विखुरलेल्या अवस्थेत आढळल्याने हा खून लूटमार करण्याच्या प्रकारातून तर झाला नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. देवरी पोलिस फरार आरोपी शोध घेत आहे…..

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी