ही भाजी आहे १ हजार रुपये किलो, तरीही लोकं आवडीनं का खरेदी करतात?

| Updated on: Aug 16, 2023 | 5:47 PM

विशेष म्हणजे मशरूम नैसर्गिकरीत्या उगवते. त्यामुळे तिला जंगलातून उपटून आणावे लागते. जंगलात काही डुंबरं असतात. या डुंबरांमधून ही मशरूम निघते.

ही भाजी आहे १ हजार रुपये किलो, तरीही लोकं आवडीनं का खरेदी करतात?
Follow us on

शाहीद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : विदर्भात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. श्रावण महिना आला की हिंदू धर्मात बहुतेख घरी मास, मटण खाणे बंद असते. अशात मटणाला पर्याय म्हणून एक रानभाजी उगवते. ती रानभाजी म्हणजे मशरूम होय. मशरूम ही खायला गरम असते. पावसाळ्यात उमस असते. अशावेळी मशरूम खाल्यास ही आरोग्यवर्धक असते. वात, लकवा, मधुमेह, रक्तदाब या आजारांवर मशरूम ही आरोग्यास चांगली असते. विशेष म्हणजे मशरूम नैसर्गिकरीत्या उगवते. त्यामुळे तिला जंगलातून उपटून आणावे लागते. जंगलात काही डुंबरं असतात. या डुंबरांमधून ही मशरूम निघते.

एक हजार रुपये किलो मशरूम

गोंदिया, देवरी, भंडारा, तुमसर, साकोली येथील बाजारात गेल्या १५ दिवसांपासून जंगलातून मशरूम आणणारे लोकं येतात. मशरूम फ्रेश असल्याने त्या सुमारे १ हजार रुपये किलोच्या भावाने विकतात. मशरूमचे महत्त्व ज्यांना माहीत आहे ते मशरूम खरेदी करून चवीने खातात. पैसे किती खर्च झाले त्यापेक्षा त्या वस्तूचे महत्त्व किती आहे, यावर काही लोकं जास्त फोकस करतात.

बकऱ्याच्या मटणाच्या दुप्पट भाव

सध्या मटण 650 रुपये किलो आहे. तर मटणापेक्षा दुप्पट पटीने महाग दराने मशरूम मिळत आहे. या जंगली मशरूमला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सोबतच चांगला दरदेखील मिळत आहे. मटणाला तोडीस तोड म्हणून मशरूमची गणना होते. नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या जिल्ह्यामध्ये ही जंगली मशरूम विक्रीला येते.

मातीतून निघते मशरूम

नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर जंगलात उगवते. गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम उपटून आणतात. एका डुंबरातून तीन दिवस मशरूम निघते. मशरूम मातीतून निघते. त्यामुळे स्वच्छ पाण्यानं धुवून विक्रीसाठी बाजारात आणले जाते.

मशरूमला आयुर्वेदिक महत्त्व

मशरूम हे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. विशेषत: बांबू म्हणजे जंगलात याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहार करत नाहीत. त्यामुळं या काळात मशरूमला मोठी प्रमाणात मागणी असते. आयुर्वेदिकसाठी मशरूमचे मोठे महत्त्व आहे.

शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करतात. जंगलातून मशरूम आणणारे मजूर या महिन्याभरात चांगली कमाई करतात. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात मशरूम निघते. त्यानंतर वर्षभर मशरूमसाठी वाट पाहावी लागते. असं संजू राऊत, सुजल दूधभारे, महेन्द्र गडे यांनी सांगितलं.