AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खशुखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ; आता पगार थेट…बँक अकाऊंट होणार फुल्ल!

DA Hike : सरकारकडून महागाई भत्त्यात आता मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पगार मिळणार आहे. याबाबत सरकारने एक पत्रक जारी केले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खशुखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ; आता पगार थेट...बँक अकाऊंट होणार फुल्ल!
DA Hike NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 11, 2026 | 7:27 PM
Share

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात आता मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पगार मिळणार आहे. याबाबत सरकारने एक पत्रक जारी केले आहे. यानुसार, महागाई भत्त्यात आला 2 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी नोकरदारांना 60 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे आता सरकारी नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सरकारच्या पत्रकात काय आहे?

महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाबाबत सरकारकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात सरकारने म्हटले की, भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक 1/1(i)/2026-E.I (B), दि. 22/04/2026 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2026 पासून लागू करण्यात आलेला 2% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.1/1/2026 पासून 60 % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता (DA) ही महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणारी अतिरिक्त रक्कम आहे. 60 टक्के महागाई भत्ता म्हणजे मूळ वेतनाच्या तुलनेत 60 टक्के अतिरिक्त रक्कम जी नोकरदारांना दिली जाते. महागाई वाढली की दररोजचा खर्चही वाढतो. अशा परिस्थितीत सरकार डीए वाढवून कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहे.

गेल्या वर्षी किती भत्ता मिळाला होता?

7 व्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार, वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) महागाई भत्ता वाढवला जातो. 2021 पासून, त्यात 10 पट वाढ झाली आहे. अहवालानुसार, जुलै 2021 मध्ये सर्वात मोठी वाढ 11 टक्क्यांनी दिसून आली होती. तर जानेवारी 2025 आणि जुलै 2025 मध्ये अनुक्रमे 2 टक्के आणि 3 टक्के वाढ झाली आहे. आता 2026 मध्ये, 2 टक्क्यांची नवीन वाढ पुन्हा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना 60 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे, यामुळे सरकारी नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?