नागोठण्यातील शासकीय विश्रामगृह अनेक महिन्यांपासून बंद; गतवैभव मिळवून देण्याची मागणी

नागोठण्यातील शासकीय विश्रामगृहाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. या शासकीय विश्रामगृहाची डागडुजी करण्यात येऊन त्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागोठण्यातील शासकीय विश्रामगृह अनेक महिन्यांपासून बंद; गतवैभव मिळवून देण्याची मागणी
Government rest house in Nagothane...need to repair
| Updated on: Nov 28, 2026 | 9:28 PM

राज वैशंपायन, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : – नागोठण्यातील शासकीय विश्रामगृह इमारतीची अवस्था अतिशय दयनीय अशी झाली आहे. या शासकीय विश्रामगृहाची डागडुजी करण्यात येऊन त्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन द्यावे अशी मागणी होत आहे. या विश्रामगृहाच्या दुर्दशेमुळे शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे ते तातडीने दुरुस्ती करून ते पुन्हा सेवेत आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागोठणे (ता. रोहा, जि. रायगड) येथील हे शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते.  यात दोन खोल्यांची व्यवस्था होती. मात्र, आता ते एकदम जीर्णावस्थेत पोहचले आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या नागोठणे शहरातील हे ऐतिहासिक शासकीय विश्रामगृह गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.

Loading...

रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून नागोठण्याची ओळख असतानाही येथील शासकीय विश्रामगृहाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली अशी झाली आहे. इमारतीच्या परिसरात झाडाझुडपांची बेसुमार अशी वाढ झाली असून, ठिकठिकाणी मातीचा खच पडला आहे.त्यामुळे साप आणि विंचू सारख्या विषारी प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ही इमारत आता जीर्ण झाली असून शासकीय इमारतीची संपूर्ण रयाच निघून गेली आहे. त्यामुळे येथे राहणे धोकादायक वाटत आहे.

शासकीय दौरे, विविध मोहिमा किंवा प्रशासकीय कामानिमित्त नागोठणे परिसरात येणाऱ्या अधिकाऱ्यांना या विश्रामगृहाचा वापर करता येत नाही. कारण ही इमारती जीर्ण झाली असल्याने त्यांना रोहा किंवा पाली येथील शासकीय विश्रामगृहाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील मोठी गैरसोय होत आहे. केवळ शासकीय अधिकारीच नव्हे, तर राजकीय नेते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि विविध कामांसाठी नागोठणे येथे येणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसत आहे.

ही चिंताजनक बाब

एकीकडे नागोठणे हे मुंबई – गोवा महामार्गालगतचे महत्त्वाचे ठिकाण असताना दुसरीकडे येथील शासकीय विश्रामगृह बंद पडून त्याची दुरवस्था होणे ही बाब चिंताजनक आहे. या विश्रामगृहाची तातडीने दुरुस्ती करून त्याला पूर्वीचे स्वरूप देण्यात यावे आणि शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या सेवेसाठी ते पुन्हा खुले करावे, अशी मागणी आता होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us