AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP News: ..तर आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला पाहिजे, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

एकीकडे शरद पवार यांच्या निर्णयावरुन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये  संतापाची लाट उसळली असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. 

NCP News: ..तर आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला पाहिजे, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
Sharad Pawar NCP
| Updated on: Nov 28, 2026 | 9:10 PM
Share

दिनकर थोरात, प्रतिनिधी: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार टिका करत संताप व्यक्त केला आहे. एकीकडे शरद पवार यांच्या निर्णयावरुन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये  संतापाची लाट उसळली असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे.

काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण?

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्पष्टपणे सांगत आहेत की अजूनही आमची चर्चा व्हायची आहे आणि आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. एक गोष्ट निश्चित आहे की डिलिमिटेशनच्या बाजूने त्यांचे मतदान होईल अशी चिन्हे दिसत आहेत. शेवटी अंतिम निर्णय होईपर्यंत त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. एक दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. इंडिया आघाडीला त्यांनी त्यांचा निर्णय कळवला असेल, आज इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्ववादीकडून कोणी गेले नसले तरी त्याचा तसा अर्थ काढणे चुकीचे आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

“शेवटी शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय त्यांच्या पक्षाला मान्य असेल. पण ते अंतिम चर्चा झाली नाही असे म्हणत असतील तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे मतही जाणून घेतले पाहिजे. पण तसा काही निर्णय झाला तर प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातील मतदारांना तोंड द्यावे लागेल. कारण भाजपच्या विरोधात मतदान घेतले आहे. ते आमच्यासोबत राहावेत अशी आमची इच्छा आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तसेच “10 जुलै 2026 रोजी मला राष्ट्रवादीच्या नवे भाजपच्या काही सूत्रांनी माहिती दिली होती. उद्धव ठाकरेंच्या पार्टीचा कार्यक्रम केला तसा शरद पवारांच्या पार्टीचा कार्यक्रम करणार आहे, असे मला सांगितले गेले. आता ती माझी माहिती होती ती माहिती खरी ठरू नये आणि ते आमच्या सोबत राहावे अशी माझी इच्छा आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणालेत.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!