आताची सर्वात मोठी बातमी, राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले, पाहा VIDEO

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे हेलिकॉप्टर पाली येथे उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे धूर सोडू लागले. पायलटने त्वरित हेलिकॉप्टर लँड केले, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. राज्यपाल सुरक्षित असून कोणतीही दुखापत झालेली नाही.

आताची सर्वात मोठी बातमी, राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले, पाहा VIDEO
हरिभाऊ बागडे
Image Credit source: social media
| Updated on: Mar 30, 2025 | 2:55 PM

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे एका हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल हरिभाऊ बागडे हे हेलिकॉप्टरमधून प्रवासाला निघाले होते. हे हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना त्यातून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच तात्काळ हेलिकॉप्टर खाली उतरवण्यात आले. यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

हेलिकॉप्टरमधून अचानक धूर कसा आला?

या अपघातातून राज्यपाल हरिभाऊ बागडे हे थोडक्यात बचावले आहे. सध्या ते सुरक्षित आहेत. या घटनेदरम्यान त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र हरीभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमधून अचानक धूर कसा आला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाहीत.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यपाल हरीभाऊ बागडे पालीच्या दौऱ्यावर होते. ते पालीमधून जयपूरकडे रवाना होत होते. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले, तेवढ्यात हेलिकॉप्टरमधून धूर निघू लागला. हेलिकॉप्टर चालवणाऱ्या पायलटच्या तात्काळ लक्षात आली आणि त्याने दुसऱ्याच मिनिटाला हेलिकॉप्टर खाली उतरवले. मात्र या घटनेमुळे राज्यपालांच्या सुरक्षेवर आणि हेलिकॉप्टरच्या स्थितीवरही प्रश्न निर्माण केले आहेत.

हेलिकॉप्टरची पूर्ण तपासणी केली जाणार

सध्या हेलिकॉप्टरमधून धूर निघण्याच्या कारणाचा शोध घेतला जात. तसेच या घटनेची चौकशीही केली जात आहे. या दरम्यान हेलिकॉप्टरची पूर्ण तपासणी केली जाणार आहे. सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले गेले की नाही हेही पाहिले जाणार आहेत. तसेच अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत