GPS Tracker : नातवाच्या हुशारीमुळे सापडली हरवलेली आजी , माळेतल्या जीपीएस ट्रॅकरची कमाल !

मुंबईत नातवाने GPS ट्रॅकर वापरून हरवलेल्या आजीला शोधून काढले. मोबाइलच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत त्याने परळमधील रुग्णालयात आजीचा पत्ता शोधला. ही घटना तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराचे उत्तम उदाहरण आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मिनी GPS ट्रॅकरची लोकप्रियता वाढत असून, ते वृद्ध व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

GPS Tracker : नातवाच्या हुशारीमुळे सापडली हरवलेली आजी , माळेतल्या जीपीएस ट्रॅकरची कमाल !
GPs Tracker
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 10, 2025 | 9:04 AM

आजकालची तरूण पिढी खूप स्मार्ट आहे, पण सतत मोबाईल आणि टेक्नॉलॉजीमध्ये गुंतलेली असते, फोनच्या डबड्यात डोकं घालून बसलेली असते, अशी टीका तरूणाईवर नेहमी होत असते. मात्र याच स्मार्ट पिढीतील एका तरूणाने टेक्नॉलॉजीचा वापर सार्थ ठरवा आणि हरवलेल्या वृद्ध महिलेला शोधून काढलं. मुंबईत राहणाऱ्या एका तरूणाने अगदी फिल्मी अंदाजात त्याच्या हरवलेल्या वृद्ध आज्जीला शोधून काढलं. आज्जीला शोधण्यासाठी तिच्या नातवाने चक्क GPS ट्रॅकरची मदत घेतली. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन एका नातवाने आपल्या बेपत्ता झालेल्या आजीचा शोध घेतला. त्याचं खूप कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 डिसेंबरला ही घटना दक्षिण मुंबईत घडली. त्या दिवशी संध्याकाळी सायरा बी ताजुद्दीन ही 79 वर्षांची महिला फेरी मारण्यासाठी घराबाहेर पडली होती, पण ती रात्री उशीरापर्यंत घरी परत आली नाही, त्यामुळे कुटुंबीय खूप चिंतेत होते. त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली.

खरंतर बाहेर गेलेल्या सायरा यांना शिवडी भागात एका वाहानन धडक दिली, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. पण सायरा यांच्या कुटुंबियांना या घटनेची काहीत माहिती नव्हती, ते त्यांचा शोध घेत होते.

नातवाने असा घेतला आजीचा शोध

तेवढ्यात सायरा यांच्या नातवाने एक युक्ति केली. त्याने आपल्या आजीच्या गळ्यात असलेल्या माळेत एक छोटासा GPS ट्रॅकर बसवला होता. नातू मोहम्मद वासिम अय्यूब मुल्ला याने त्याच जीपीएस डिव्हाइसची मदत घेतली आणि आजीचं लोकेशन शोधायला सुरूवात केली. त्याने मोबाीलमध्य जीपीएस ओपन करून आजीचं लोकेशन ट्रॅक केलं. त्यांचं लोकेशन परळच्या केईएम रुग्णालय दाखवत होते. त्यानंतर त्या वृद्ध महिलेचे संपूर्ण कुटुंब तिच्याजवळ पोहोचले. आणि त्या महिलेला केईएममधून जे.जे. रुग्णालय रेफर करण्यात आले. जीपीएसच्या मदतीने वृद्ध महिलेची तिच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट झाली.

Mini GPS ट्रॅकरची वाढली लोकप्रियता

सध्या बाजारात, ऑनलाइन आणि ऑपलाइनही अनेक छोटे जीपीएस ट्रॅकर (Mini GPS Tracker) मिळतात जे वृद्ध नागरि, पाळी प्राणी, गाड्या आणि बॅग्सना लावता येतात. भारतातील अनेक कंपन्या घालण्यायोग्य GPS ट्रॅकर्स विकतात. तुम्ही ते नेकलेससारखे देखील घालू शकता. लोकप्रिय पर्यायांमध्ये Apple AirTag, JioTag, MotoTag आणि Samsung Tag2 यांचा समावेश आहे. हे ट्रॅकर्स खूपच परवडणाऱ्या किमतीत असतात. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोअरमधून 1 ते 4 हजार रुपयांमध्ये सहज खरेदी करू शकता.