उस्मानाबाद जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायती बिनविरोध, किती ठिकाणी निवडणूक होणार?

| Updated on: Jan 15, 2021 | 7:45 PM

उस्मानाबाद जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायती उमरगा तालुक्यातील आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायती बिनविरोध, किती ठिकाणी निवडणूक होणार?
Follow us on

उस्मानाबाद : सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचं वातावरण आहे. त्यातच निवडणुका बिनविरोधसाठीही जोरदार प्रयत्न झाले. याचाच परिणाम म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 पैकी 40 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायती उमरगा तालुक्यातील आहेत. कळंब, परंडा, लोहारा या तालुक्यातीलही प्रत्येकी 5, उस्मानाबाद तालुक्यातील 3, तुळजापूरमधील 4, भूम तालुक्यातील 7 आणि वाशी तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी दिली (Grampanchayat Election Updates of Osmanabad).

उमरगा तालुक्यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यात भिकार सांगवी, मुळज, जकेकुर, जकेकुरवाडी, चिंचकोटा, बाबळसुर, कोळसुर गु, एकोंडी, पळसगाव आणि मातोळा या गावांचा समावेश आहे. लोहारा तालुक्यात 5 बिनविरोध ग्रामपंचायती आहेत. त्यात आरणी, मार्डी, राजेगाव, तावशिगड आणि धानुरी या गावांचा समावेश आहे. भूम तालुक्यातील 7 बिनविरोध ग्रामपंचायत आहेत. त्यात उमाचीवाडी, बेदरवाडी, नान्नजवाडी, सोन्नेवाडी, वरूड, बागलवाडी आणि गोलेगाव यांचा समावेश आहे.

परंडा तालुक्यातील देवगाव, खंडेश्वरवाडी, कपिलापुरी, उंडेगाव आणि भोंजा या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा, वाकडी, आडसुळवाडी, लासरा आणि दुधाळवाडी या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता, डकवाडी आणि पोहनेर या 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर तुळजापूर तालुक्यातील बारुळ, वानेगाव, अमृतवाडी आणि पिंपळा खुर्द ही गावे बिनविरोध झाली. वाशी तालुक्यातील एकमेव सारोळा ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी 40 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता केवळ 388 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत 3 लाख 13 हजार 326 स्त्रिया, 3 लाख 60 हजार 659 पुरुष आणि 5 इतर असे 6 लाख 73 हजार 990 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

हेही वाचा :

उस्मानाबाद! स्वस्त आणि मस्त फिरा, तुळजाभवानी दर्शन ते नळदुर्ग किल्ला, विश्रामगृहांची किंमत एकदम किफायतशीर

‘डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा’, शिवसेना आमदाराच्या मुलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पदवीधर निवडणुकीच्या मेळाव्यात नेत्यांचा उदंड उत्साह, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Grampanchayat Election Updates of Osmanabad