कुणाल चांदगुडे याच्या आजोबाने सर्वच सांगितले, मावशीच्या आरोपांवर..
कुणाल चांदगुडे प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. त्यामध्येच आता मोठी माहिती पुढे आली. कुणालच्या मावशीने केलेल्या आरोपांवर अगोदरच कुणालच्या आजोबांनी उत्तर दिले. शेतीबद्दल त्यांनी सर्वकाही सांगून टाकले.

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यू प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. सुरूवातीला सांगितले गेले की, कुणालला आयफोन पाहिजे, होता त्यामुळे तो खवड्या डोंगरावर पोहोचला. मात्र, त्यानंतर कुणालच्या काकाने खुलासा केला की, कुणालकडे दोन आयफोन होते. कुटुंबात काही वाद होता, असेही त्यांनी यादरम्यान सांगितले. संगीता यांच्या कुटुंबियांकडून आणि मुरलीधर यांच्या कुटुंबियांकडून आरोप केले जात आहेत. कुणालला वाचवण्यासाठी मुरलीधर वडील यांनी त्याचा हात पकडला. पण यादरम्यान दोघेही खाडी पडले. त्यांच्यामागे आई संगीताही खाली पडली. आईने कुणालला हात जोडले, गळ्यातील मंगळसूत्र काढून संगीता यांनी फेकले पण काहीच उपयोग झाला नाही. काही क्षणात पूर्ण कुटुंब संपले. कुणाल याचे खवड्या डोंगलावरील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शेवटच्या क्षणाला काय घडले हे व्हिडीओंवरून स्पष्ट होतंय.
कुणाल, संगीता आणि मुरलीधर यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ज्यानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली. यादरम्यानच मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणीने गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, आमच्या भावाला तिने आम्हाला बोलू दिले नाही. 25 वर्षानंतर तो गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला बोलत होता. पण त्याला घराबाहेर काढून टाकण्यात आले.
यादम्यानच मुरलीधर यांच्या वडिलांनी त्यांच्या नावावर शेती केली होती. ती शेती मुरलीधर यांनी बटईने दिली होती. मात्र, संगीता यांच्याकडून शेअर करण्यात आलेल्या अनेक व्हिडीओमध्ये शेतीचा उल्लेख करत गंभीर आरोप करण्यात आले. ननंदेवर आरोप करताना संगीता या दिसल्या. मुरलीधर यांच्या वडिलांनीही स्पष्ट केले की, मी त्याला माझी शेती दिली होती. मी त्याच्या नावावर ही शेती केली होती.
तेच कुणालच्या मावशीने यादरम्यान आरोप करत शेतीचा उल्लेख केला. पण मुरलीधर यांच्या वडिलांनी स्पष्ट केले की, मी माझी शेती मुरलीधर याच्या नावावर केली होती. चांदगुडे कुटुंबियांमध्ये शेतीच्या मुद्द्यावरून वाद असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मुरलीधर यांच्या नावावर शेती होती, हे त्यांच्या वडिलांनीच स्पष्ट केले.