VIDEO : सासू-सासऱ्यांकडून सुनेचे कन्यादान, अनोख्या विवाहाची जिल्ह्यात चर्चा 

| Updated on: Mar 07, 2021 | 11:56 PM

पण बुलडाण्यात सासू सासऱ्यांनी सूनेचे कन्यादान केले आहे. (In-laws Kanyadan daughter in law)

VIDEO : सासू-सासऱ्यांकडून सुनेचे कन्यादान, अनोख्या विवाहाची जिल्ह्यात चर्चा 
बुलडाणा सासू-सासऱ्यांकडून सुनेचे कन्यादान
Follow us on

बुलडाणा : कन्यादान हा लग्नातील महत्त्वाचा विधी मानला जातो. हिंदू धर्मात जेव्हा वडील आपल्या मुलीचा हात मुलाला सोपवतात त्या विधीला कन्यादान असे म्हटले जाते. पण बुलडाण्यात सासू सासऱ्यांनी सूनेचे कन्यादान केले आहे. आपल्या सुनेचे कन्यादान करून त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या विवाहाची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. (In-laws Kanyadan daughter in law at Buldana Wedding)

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या ठिकाणी ही घटना घडली. सुनगाव येथील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाचा धामणगाव तालुका संग्रामपुर येथील राधा उमाळे यांच्यासोबत 16 मार्च 2020 रोजी विवाह झाला होता. मात्र दुर्देवाने 31 ऑगस्ट 2020 ला संतोषचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला.

बुलडाणा सासू-सासऱ्यांकडून सुनेचे कन्यादान

नवऱ्याच्या मृत्यूनंतर राधा ही आपल्या सासू सासऱ्यांकडे राहत होती. तिचे सासरे शालिग्राम वानखडे आणि सासू वत्सलाबाई यांनी राधाचा स्वत:च्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. राधा सात ते आठ महिने सासरी राहत होती. काल राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्‍न राजनकार यांच्याशी झाला. हा विवाह नोंदणी पद्धतीने आयोजित केला होता. या विवाहदरम्यान तिच्या सासू सासऱ्यांनी सुनेचे कन्यादान केले. त्यामुळे एक आदर्श प्रस्थापित झाला आहे.

विशेष म्हणजे या विवाहासाठी तिच्या सासऱ्यांनी सात ते आठ महिन्यांनी प्रयत्न केला. या विवाहात कोरोनाचे सर्व नियम पाळले गेले. तसेच मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह पार पडला. हा विवाह सोहळा सुनगाव येथे पार पडला. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या विवाहाची समाजातील प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी. (In-laws Kanyadan daughter in law at Buldana Wedding)

संबंधित बातम्या : 

सांगली पोलिसांची धडक कारवाई, 6 लाखांचा गुटखा पकडला

बाप, भाऊ आणि आजी पाण्यात बुडत होते, 7 वर्षाच्या तनुजाने जन्मदात्याला वाचवलं, वाचा तिच्या धाडसाची गोष्ट…