Video | उस्मानाबादेत ओमराजे निंंबाळकर भडकले, ‘तू जास्त बोलू नको’ म्हणत भाजप कार्यकर्त्यांना भरला दम

| Updated on: Oct 22, 2021 | 12:24 AM

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद दौरा चांगलाच वादळी ठरला. त्यांच्या दौऱ्यादरम्यान उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तसेच 'तू जास्त बोलू नको' असे म्हणत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिला.

Video | उस्मानाबादेत ओमराजे निंंबाळकर भडकले, तू जास्त बोलू नको म्हणत भाजप कार्यकर्त्यांना भरला दम
OSMANABAD OMRAJE NIMBALKAR
Follow us on

उस्मानाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद दौरा चांगलाच वादळी ठरला. त्यांच्या दौऱ्यादरम्यान उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तसेच ‘तू जास्त बोलू नको’ असे म्हणत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिला. या पूर्ण वादाचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं ?

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख कळंब तालुक्यातील बाहुला गावातील बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोयाबीनचे किती नुकसान झाले हे दाखवण्यासाठी खराब झालेले सोयाबीन सोबत आणले होते. मात्र, हे सोयाबीन गडाख यांनी पाहिले नाही. याच कारणामुळे भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर भाजप तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. ‘तू जास्त बोलू नको’ असे म्हणत शिवसेनेच्या खासदाराने भाजपच्या कार्यकर्त्यांना दम दिला.

दरम्यान, या पूर्ण वादाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर तू जास्त बोलू नकोस असे स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

लोकांचा रोष थंड करण्यासाठी अधिकाऱ्यांना निलंबित करुन नंतर पुन्हा कामावर घ्यायचं, हे म्हणजे थंड करुन मलिदा खाणे : राजू पाटील

सावधान, रशियात कोरोनाची पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, नॉन वर्किंग विकची घोषणा

Video | अमानुष ! जळगावमध्ये मांजरीनं कोंबडीवर ताव मारला तर मालकानं बंदुकीची गोळी डोक्यात घातली

(guardian minister shankarrao gadakh visited osmanabad clash between mp omraje nimbalkar and bjp activist)