Video | अमानुष ! जळगावमध्ये मांजरीनं कोंबडीवर ताव मारला तर मालकानं बंदुकीची गोळी डोक्यात घातली

आपल्या कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्यामुळे एका माथेफिरूने मांजरीची गोळी घालून हत्या केली आहे. ही अमानुष घटना जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात घडली आहे.

Video | अमानुष ! जळगावमध्ये मांजरीनं कोंबडीवर ताव मारला तर मालकानं बंदुकीची गोळी डोक्यात घातली
JALGAON CAT


जळगाव : कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्यामुळे एका माथेफिरूने मांजरीची गोळी घालून हत्या केली आहे. ही अमानुष घटना जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निर्दयी माथेफिरूने केलेल्या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.

माथेफिरुने मांजरीच्या कपाळावर निशाणा साधला

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर या भागात पुष्कराज बानाईत हे आपल्या परिवारासह राहतात. परिसरात असलेल्या भटक्या मांजरींचे ते संगोपन करतात. बानाईत यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने कोंबड्या पाळलेल्या आहेत. बानाईत पाळत असलेल्या एका मांजरीने कोंबड्याच्या पिल्लाची शिकार केली. या घटनेची माहिती होताच शेजारी राहणारा माणूस चांगलाच भडकला.

पाहा व्हिडीओ :

माणसावर कठोर कारवाई करा, प्राणीप्रेमींची मागणी

त्या माथेफिरु माणसाने छर्रे असणाऱ्या बंदुकीच्या माध्यमातून मांजरीचा जीव घेतला. माणसाने मांजरीच्या कपाळावर निशाणा साधला. छर्रा थेट कपाळात घुसल्यामुळे मांजरीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तसेच प्राणीप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या माणसावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे.

इतर बातम्या :

अनन्या पांडेची आजची चौकशी संपली, उद्या पुन्हा वानखेडेंसमोर हजेरी, नेमकं काय-काय घडलं?

VIDEO : काय चाललंय ठाण्यात? आता अंबरनाथमध्ये चोरट्यांनी चौकात उभ्या असलेल्या तरुणाच्या हातून मोबाईल हिसकावला

VIDEO : कल्याणमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, हजारोंचे कपडे चोरताना कॅमेऱ्यात कैद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI