VIDEO : कल्याणमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, हजारोंचे कपडे चोरताना कॅमेऱ्यात कैद

कल्याणमध्ये महिला चोरांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे ही एक टोळीच आहे. ही टोळी दुकानामध्ये एकत्र जाऊन सामानाची चोरी करते. त्यांचा चोरीचा प्रकार नुकताच एका कपड्याच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

VIDEO : कल्याणमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, हजारोंचे कपडे चोरताना कॅमेऱ्यात कैद
कल्याणमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, हजारोंचे कपडे चोरताना कॅमेऱ्यात कैद


कल्याण (ठाणे) : कल्याणमध्ये महिला चोरांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे ही एक टोळीच आहे. ही टोळी दुकानामध्ये एकत्र जाऊन सामानाची चोरी करते. त्यांचा चोरीचा प्रकार नुकताच एका कपड्याच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे चार ते पाच महिलांसोबत एक पुरुष देखील असल्याची माहिती आहे. त्याचा चेहरा सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या आरोपींना पोलीस लवकर पकडतील, अशी आशा केली जातेय.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात घडली आहे. सूचक नाका परिसरात एका कपड्याच्या दुकानात महिला चोरांनी चोरी केली आहे. महिलांनी दुकानात काम करणाऱ्या महिलांना बोलण्यात गुंतवत हजारो रुपयांचे कपडे चोरले. त्यानंतर त्या पसार झाल्या. महिलांच्या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोरी करणाऱ्यांमध्ये चार महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.

चोरी झाल्याचं कसं उघडकीस आलं?

महिलांनी फक्त कपड्यातील एकाच दुकानात नाही तर त्याच परिसरातील आणखी दोन दुकानांमध्ये अशाप्रकारे चोरी केल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे कपड्याच्या दुकानात चोरी करुन महिला पसार झाल्या. त्यानंतर दुकानात काम करणाऱ्या महिलांना आपल्या दुकानात माल कमी जाणवायला लागला. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आला. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला प्रकार बघून दुकानमालक असलेल्या महिलेला धक्काच बसला. कारण आरोपी महिलांनी प्रचंड चपळपणे फसवणूक करत हजारो रुपयांचे कपडे चोरी केले.

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु

या घटनेनंतर दुकान मालक असलेल्या निशा वाघ यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्यांनी सर्वप्रकार पोलिसांना सांगत तक्रार नोंद केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही घेतले आहेत. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात जेणेकरुन तरंच अशा घटनांना जरब बसेल, अशी मागणी परिसरातील दुकानदारांकडून होत आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा:

पुण्यात भर दिवसा महाराष्ट्र बँकेवर दरोडा

दुसरीकडे पुणे जिल्ह्यातून आज धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भर दिवसा चक्क महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत बँकेतील लाखो रुपयांची रोख रक्कम आणि कोट्यवधींचे सोने लंपास केले आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे.

संबंधित घटना ही शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली आहे. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बँकेत दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मुद्देमाल चोरुन नेला.

हेही वाचा :

6 कांदा व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी आयकरचे छापे; पिंपळगाव बसवंत येथील कारवाईने खळबळ

तोंडोळी दरोड्यानं औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले, वाचा वर्षात किती चोऱ्या, किती घरफोड्या?

VIDEO : पुण्यात भर दिवसा महाराष्ट्र बँकेवर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत कोट्यवधींचं सोनं लुटलं, लाखोंची रोकड लंपास

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI