AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंडोळी दरोड्यानं औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले, वाचा वर्षात किती चोऱ्या, किती घरफोड्या?

गंगापूरनंतर सिल्लेगाव, चिकलठाणा, खुलताबाद आणि वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या हद्दीत लोकसंख्या जास्त असल्यामुळे चोरीच्या घटनांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तोंडोळी दरोड्यानं औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले, वाचा वर्षात किती चोऱ्या, किती घरफोड्या?
तोंडोळी येथील घटनास्थळाची पोलिसांकडून पाहणी.
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 4:20 PM
Share

औरंगाबादः तोंडोळी दरोड्याच्या घटनेनंतर (Tondoli Robbery) औरंगाबादमधील ग्रामीण भागातील (Auranagabad rural area) वाढलेल्या चोऱ्या आणि दरोड्यांच्या प्रमाणावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 961 चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी 446 घटना उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आहे. तर चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 37 टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंतच्या रेकॉर्डनुसार-

– औरंगाबाद ग्रामीण हद्दीत मागील नऊ महिन्यांत 6 दरोडे पडले. – 34 ठिकाणी जबरी चोऱ्या झाल्या. – 106 घरफोडीच्या घटना घडल्या. – यातील दरोड्यातील सर्व गुन्हे उघडकीस आले असून 25 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. – याशिवाय ग्रामीण भागात जनावर चोरी, दुचाकी-चारचाकी वाहन, वाळू चोरी, मंदिरातील चोरी, मोबाइल चोरी, तार, खिसेकापू, शेतीची अवजारे चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. – 9 महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात 931 चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. – त्यातील 446 घटनांचा पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. – यातील गुन्हे उघड करण्याचे प्रमाण 46 टक्के एवढे आहे. तर 37 टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

गंगापूरमध्ये सर्वाधिक चोऱ्या

औरंगाबाद ग्रामीण पोलीस हद्दीत गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक चोरीच्या घटना उघडकीस आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गंगापूरनंतर सिल्लेगाव, चिकलठाणा, खुलताबाद आणि वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या हद्दीत लोकसंख्या जास्त असल्यामुळे चोरीच्या घटनांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

20 दिवसात 100 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा छडा

औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागाने मागील 20 दिवसात तब्बल 100 पेक्षा अधिक गुन्हे उघड करून मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे. तसेच ग्रामीण पोलिसांच्या तपासाचा वेग पुढील काळातही असाच राहील, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

इतर बातम्या-

पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!

औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त बिल्डिंगचा उद्घाटनापूर्वीच वाद, वकील संघाची नाराजी, बहिष्काराचे संकेत

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.