सावधान, रशियात कोरोनाची पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, नॉन वर्किंग विकची घोषणा

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घोषणेनंतर मॉस्कोमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महापौर सोब्यानिन म्हणाले की केवळ सुपरमार्केट आणि फार्मसी सारख्या अत्यावश्यक दुकानांनाच खुले राहण्याची परवानगी असेल. 

सावधान, रशियात कोरोनाची पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, नॉन वर्किंग विकची घोषणा
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची नॉन वर्किंग विकची घोषणा

रशिया : कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला प्रसार पाहता रशिया खूपच त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर रशइयाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नॉन वर्किंग विकची घोषणा केली आहे. सर्व कामगारांना भरपगारी रजा देण्यात येणार आहे. तसेच लोकांनाही घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी, 28 ऑक्टोबरपासून राजधानी मॉस्कोमध्ये आठवडाभर राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (Russian President Putin announces non-working week to gain control of Corona)

मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी म्हटले आहे की सर्व दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद असतील. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घोषणेनंतर मॉस्कोमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महापौर सोब्यानिन म्हणाले की केवळ सुपरमार्केट आणि फार्मसी सारख्या अत्यावश्यक दुकानांनाच खुले राहण्याची परवानगी असेल.

मृतांचा आकडा वाढतच आहे

पुतिन यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार नॉन वर्किंग विकचा प्रस्ताव दिला आहे. बुधवारी, रशियामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोविड -19 मुळे 1,028 लोकांचा मृत्यू झाला. महामारीच्या प्रारंभापासून एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे.

रशियामध्ये साथीच्या आजाराने मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 226,353 झाली आहे, जी युरोपमधील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. हे पाहता, सरकारच्या मंत्रिमंडळाने असे सुचवले होते की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एक आठवड्यासाठी सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.

पुतिन यांनी बुधवारी सांगितले की, ते 30 ऑक्टोबर रोजी नॉन वर्किंग विक सुरू करण्याच्या आणि पुढील आठवड्यापर्यंत वाढविण्याच्या मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला पाठिंबा देत आहेत. वास्तविक, 30 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्याच्या पुढील आठवड्यातील 7 दिवसांपैकी पहिले 4 दिवस सरकारी सुट्ट्या आहेत.

लसीकरणापासून दूर पळतात लोक

पुतीन यांनी बुधवारी आदेश दिले की, 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत देशात लॉकडाऊन असेल. त्यांनी प्रादेशिक नेत्यांना सांगितले आहे की जर त्यांना असे वाटत असेल की आणखी कठोर उपाय लागू केले पाहिजेत तर ते आदेश देऊ शकतात. ते म्हणाले की काही भागात जिथे परिस्थिती सर्वात धोकादायक आहे, काम न करण्याचा कालावधी शनिवारपासून सुरू होऊ शकतो.

बहुतेक आरोग्य कर्मचारी कोविड -19 रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त असल्याने काही भागात सामान्य आरोग्य सहाय्य सुविधा निलंबित करण्यात आल्या आहेत. देशात कोविडविरोधी लसीकरणाचा वेगही अपेक्षेपेक्षा कमी आहे. एकूण 14.6 कोटी लोकसंख्येपैकी आतापर्यंत फक्त 4.5 कोटी (32 टक्के) पूर्ण लसीकरण झाले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने असे म्हटले आहे की, देशात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे संसर्ग खूप जास्त आहे. वृत्तपत्राने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, देशातील लोकांना रशियाच्या अधिकाऱ्यांवर विश्वास नाही. देशातील केवळ 32 टक्के लोकांना ही लस मिळू शकली आहे, म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या केवळ एक तृतीयांश लोकांना लस देण्यात आली आहे.

कोविड -19 ची लस सरकार देशभर पुरवत आहे, पण तरीही लोक त्यातून माघार घेत आहेत. ऑगस्टमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील 52 टक्के लोकसंख्येला लसीकरणामध्ये रस नाही. राष्ट्रपती पुतीन यांनी अनेक वेळा लसीकरणाचे आवाहन केले असताना ही परिस्थिती आहे. (Russian President Putin announces non-working week to gain control of Corona)

इतर बातम्या

china covid cases 2021: चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, विमान फेऱ्या रद्द, शाळा बंद, जागोजागी मास टेस्टिंग सुरु

माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म करणार लाँच!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI