गुलाबरावांनी ‘डाकू’ म्हणताच नाथाभाऊंनी ‘चोर’ म्हणत काढले उट्टे; शिवसेना-राष्ट्रवादीत शिव्यांची लाखोली

| Updated on: Feb 20, 2022 | 12:14 PM

सभ्यता राजकारणातून बाद होत चाललीय. यशवंतराव चव्हाणच काय अगदी परवापरवा म्हणजेच विलासराव देशमुख यांच्यापर्यंतचा काळही आता इतिहास जमा झाला असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वेगवेगळ्या प्रकरणावरून चिखलफेक सुरू असलेली उभा महाराष्ट्र पाहतोय. दुसरीकडे मांंडीला मांडी लावून बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्येही तेच सुरू आहे.

गुलाबरावांनी डाकू म्हणताच नाथाभाऊंनी चोर म्हणत काढले उट्टे; शिवसेना-राष्ट्रवादीत शिव्यांची लाखोली
एकनाथ खडसे, आणि गुलाबराव पाटील यांच्यातला वाद वाढला.
Follow us on

जळगावः सभ्यता राजकारणातून बाद होत चाललीय. यशवंतराव चव्हाणच काय अगदी परवापरवा म्हणजेच विलासराव देशमुख यांच्यापर्यंतचा काळही आता इतिहास जमा झाला असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वेगवेगळ्या प्रकरणावरून चिखलफेक सुरू असलेली उभा महाराष्ट्र पाहतोय. यालाच वैतागून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चक्क विधानसभेत त्रागा व्यक्त केला. त्यांनंतर अगदी काल-परवाही त्यांनी जपून बोलण्याचे आवाहन केले. मात्र, हेच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेतेही विसरलेत. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) एकीकडे खडसेंना (Eknath Khadse) डाकू म्हणत आहेत. तर त्याचे उट्टे खडसे हे चोर म्हणून काढत आहेत. या दोन नेत्यांमध्ये अक्षरशः शिव्यांची लाखोली सुरूय.

गुलाबराव काय म्हणाले?

अहमदनगर येथे दोनच दिवसांपूर्वी एक कार्यक्रम झाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांवरही जोरदार टीका केली. या टीकेने इतक्या खालचा स्तर गाठला की, बहुदा गुलाबराव पाटील आपण काय बोलत आहोत, हेच विसरले. त्यामुळे त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य आपण ज्यांच्या मांडीला मांडी लावून राज्यात सत्तेत बसलोत, त्यांच्याबद्दल केले. पाटील म्हणाले, आमच्या जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्यासारखा डाकू बसला आहे. अर्थातच याचा समाचार खडसेंनीही घेतलाच.

नाथाभाऊ काय म्हणाले?

गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेबद्दल माध्यमांनी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गुलाब पाटील उच्चशिक्षित आहेत. ते निर्व्यसनी आणि कार्यतत्पर मंत्री आहेत. मात्र, ते एकनाथ खडसे हे आमच्या जिल्ह्यात डाकू आहेत, असे म्हणतात. मला वाटते, अशा निर्व्यसनी माणसाविरुद्ध न बोललेले बरे. ‘चोरो को सारे नजर आते है चोर’ असे एकच वाक्य म्हणत त्यांनी गुलाबरावांवर टीका केली.

‘राष्ट्रवादी’ आक्रमक

गुलाबराव पाटील यांनी खडसेंना डाकू म्हटल्यामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. यापूर्वीही गुलाबराव पाटलांनी वारंवार खालच्या स्तरावरची टीका खडसे यांच्यावर केली. एकीकडे ते घटकपक्षातील नेत्यांवर सभ्यता सोडून टीका करतात. मात्र, भाजपपुढे लोटांगण घालतात. त्यामुळे गुलाबराव पाटलांविरोधात आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलाय.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात