Gulabrao Patil : भाजपवाले पक्ष फोडतात, तुम्हीही विद्यार्थी फोडा! गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

Gulabrao Patil Statement On Teachers Day : भाजपचे नेते पक्ष फोडतात, त्याच पद्धतीने शिक्षकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी मराठी शाळांकडे वळवावेत, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला असून, पाटलांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

Gulabrao Patil : भाजपवाले पक्ष फोडतात, तुम्हीही विद्यार्थी फोडा! गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला
Gulabrao Patil Teachers Day 2026 Speech
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 5:10 PM

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या राजकारणाचा सल्ला आता शिक्षकांना दिला आहे. यापूर्वी मंत्री महोदयांनी भाजपवर अनेकदा टीका केली आहे. पण आता जळगावमध्ये शिक्षकदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट शिक्षकांनाच विद्यार्थ्यांच्या फोडा फोडीचा सल्ला दिला आहे. गुलाबराव पाटीलांनी नेमकं काय म्हटलंय?

शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीच भाजपवर टीका करताना दिसतात. त्यामुळे नेहमी भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यातली खडाजंगी समोर येत असते. पण यावेळी मात्र पाटलांनी भाजपच्या राजकारणासारखं राजकारण शिक्षकांनीही करावं, असा सल्ला शिक्षकांनाच दिला आहे. त्यामुळे त्याचं वक्तव्य आता प्रचंड चर्चेत आलं आहे.

गुलाबराव नेमंक काय म्हणाले?

त्यांनी म्हटलं की, “ज्या पद्धतीने भाजपवाले आमचे लोक फोडतात, पक्ष फोडतात या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात असं सगळं करतात, त्याच आता पद्धतीने मराठी शाळांमधली विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून शिक्षकांनीदेखील आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी फोडले पाहिजेत असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांना दिला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.

गुलाबराव पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे म्हटलं की, ” मराठी शाळांमधील पटसंख्या टिकवणं हे एक फार मोठे चॅलेंज बनले आहे आणि त्यामध्ये कुटुंब नियोजनाची व्याख्या हा देखील मोठा विषय आहे. आता हम दो हमारे दो और इंग्लिश मे जाने दो हा मोठा कार्यक्रम बनला आहे” असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

त्यांनी पुढे बोलताना सांगितंली की, “सरकारी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची जशी स्पर्धा आहे तशी आता खाजगी इंग्रजी शाळांमध्ये देखील मोठी स्पर्धा तयार झाली आहे. ” दरम्यान, मंत्र्यांच्या त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उचावल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us