Gunratna Sadavarte: डंके की चोट पे सांगतो, एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री…; गुणरत्न सदावर्ते नेमकं काय बोलून गेले? राजकारणात चर्चांना उधाण

Gunaratna Sadavarte News: संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर गुणरत्न सदावर्ते हसल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मात्र ठाम दावा केल्याचे समोर आले आहे.

Gunratna Sadavarte: डंके की चोट पे सांगतो, एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री...; गुणरत्न सदावर्ते नेमकं काय बोलून गेले? राजकारणात चर्चांना उधाण
| Updated on: Oct 30, 2026 | 8:21 PM

गुणरत्न सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. कालच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे होते. ते ऑरगॅनिक राजकारणी वाटत होते, असं ते यावेळी म्हणाले आहेत. ते म्हणाले की, नॅचरल कार्यक्रम होता. ग्रंथालीला सॅल्यूट आहे. असा कार्यक्रम ठेवला. 3 नेते रोज फ्लॉवरसारखे दिसले. महाराष्ट्राने वेगळा आदर्श घेतला, असं त्यांनी सांगितलं आहे.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, महाराष्ट्राला सांस्कृतिक ठेवा आहे. एकनाथ शिंदे यांचं राजकारण हे संकरित राजकारण सुरु आहे. पूर्णेकर कुटुंबसाठी पोलिसांनी हयगय करू नये, असं मी आवाहन करतो. शंका आहे कोणी तरी दाढीवाला अजगर किंवा डीसीपी अधिकारी असेल. आज मी सांगतोय काही दिवसांत लाईन क्लिअर होईल. भाजपचे नवनाथ बन आमच्या रक्ताचे आहेत. लायकी काढली तर लायकीत राहावं लागेल, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

Loading...

ते म्हणाले की, कोणत्याच परिस्थितीमध्ये संकरितपणे राजकारण नको. कालचं राजकारण होतं ग्रंथालीनी उभारलेलं ते चांगल होतं. राज ठाकरेंचं राजकारण काही पाकिस्तानी नाही. मी व्यक्ती म्हणून राज ठाकरेंचा धुऱ्याचा भांडण करत नाही. विरोधी भाष्य काही विषयावर करावं लागतं. ग्रंथालीच्या कार्यक्रमाने हेच महाराष्ट्राच राजकारण आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी उद्याच्या दिवाळीला मुख्यमंत्री यांना का बोलवू नये? आम्ही काही भाजपचे प्रवक्ते नाही आहोत.

मुख्यमंत्र्यांना माझ्या घरी बोलवलं तर माझ्या घरी त्यांना यावं लागेल. उद्धवजी यांनी बोलवलं तर त्यांना जावं लागेल. काल ऑरगॅनिक पॉलिटिकल राजकारण दिसलं. राजकारणी काही गोष्टी एका वेळेच्या असतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे, असं सदावर्ते म्हणाले आहेत. संजय शिरसाठांवर बोलताना ते म्हणाले की, असं होत असतं असं काही होत नाही. संकरित राजकारण करत बसलो तर राजा मंत्री होत असतो. शिरसाठ काय म्हणतात ते त्यांचं व्यतिगत प्रेम आहे. डंके की चोट पे सांगतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत.

गुणरत्न सदावर्तेंनी संजय गायकवाडांवरही वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांबद्दल असं बोलणं किती दलबद्री आहे. ही कोणती विचारधारा आहे. काँग्रेस विचार धारेतून आणि संकरित राजकारणातून येत सर्व, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us