AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदापुरात शरद पवार गटात फूट, हर्षवर्धन पाटलांची पहिली प्रतिक्रिया

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, यावर आता हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

इंदापुरात शरद पवार गटात फूट, हर्षवर्धन पाटलांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Nov 03, 2024 | 9:50 PM
Share

आज शरद पवार इंदापूर दौऱ्यावर होते. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत, शरद पवार यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान शरद पवार यांचा दौरा आटोपताच पक्षाला इंदापूरमध्ये पहिला धक्का बसला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाराज नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांची साथ सोडत इंदापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावर आता हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन पाटील? 

पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. नाराज नेत्यांच्या मनातील नाराजी काढण्याचा प्रयत्न साहेबांनी केला. विधानसभेच्या उमेदवारीमुळे कोणीतरी इकडे तिकडे नाराज झाला असेल. सर्व नेते महाविकास आघाडीचं काम करतील. तालुक्यातील जनतेला आता बदल हवा आहे. राज्यात देखील सत्ता बदल हवा आहे. तशी हवा इंदापूर मतदार संघात वाहू लागली आहे.  शरद पवार यांचा हा दौरा जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी होता.मतदान वाढल्यानंतर कोणी ना कोणी डॅमेज होणारच आहे. या तालुक्यातील लोक शंभर टक्के यावेळी बदल करतील, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्याच्या शेतमालाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि हे सरकार हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे अशी भावना निर्माण होत आहे. वीजबिलमाफी फसवी आहे.  महाराष्ट्राची पीछेहाट होत चाललेली आहे. लोकांचं मत असं आहे की लोकांना यावेळी सरकार बदलायचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात शंभरटक्के येणार आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान आज इंदापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांची साथ सोडत इंदापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर देखील जोरदार टीका केली.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!