मुश्रीफांना का नकोय नगरचे पालकमंत्रिपद? म्हणतात जबाबदारीतून मुक्त करा…

| Updated on: Jan 13, 2022 | 5:39 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. मात्र मुश्रीफांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्याचे विधान केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुश्रीफांना का नकोय नगरचे पालकमंत्रिपद? म्हणतात जबाबदारीतून मुक्त करा...
हसन मुश्रीफ
Follow us on

अहमदनगर : राज्यात अनेक नेत्यांना त्यांचे जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. मात्र मुश्रीफांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्याचे विधान केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अहमदनगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री पदावरून मला मुक्त करावं अशी इच्छा मी 5 व्यक्त महिन्यांपूर्वी केली होती, मात्र अजूनही मला मुक्त केलं नाही असे वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे मुश्रीफांना नगरचे पालकमंत्रीपद का नकोय? असा सवाल उपस्थित राहिला आहे.

पालकमंत्री राहिल्यास झेंडा वंदनला येईन

पालकमंत्रिपदावरून मुक्त होईल त्यावेळी देखील नगरवर माझं तितकंच प्रेम राहील असेही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. जोपर्यंत आहे, तसेच तोपर्यंत प्रामाणिक काम करून तुमची सेवा करत राहील अस त्यांनी म्हटलंय. तर 26 जानेवारीला जर मी पालकमंत्री राहिलो तर झेंडा वंदनला येईल अस मुश्रीफ यांनी सांगितलय. त्यामुळे लवकरच नगरचे पालकमंत्री बदलण्याची संकेत मिळतायत. तर राज्यमंत्री प्रजासत्ताक तनपुरे यांच नाव सध्या चर्चेत आहे.

मुश्रीफांना पदमुक्त करणार?

मुश्रीफांनी जरी पदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेतंय? ही जबाबदारी दुसऱ्या कुणाला देणार? की त्यांच्याकडेच ठेवणार? याकडेही नगरकरांचे लक्ष लागले आहे. जर पालकमंत्री बदलले तर हे पद नगरमधील कुठल्या नेत्याकडे जाणार की पुन्हा जिल्ह्याच्या बाहेरच्या नेत्याकडे हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

UP Assembly Election: अखिलेशच्या नेतृत्वात भाजपच्या विरोधात लढणार शरद पवार

Breaking : मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांना मोठा धक्का, गणित नेमकं कसं जुळलं?

अहमदनगरमधील शिवसैनिकांची दुहेरी हत्या, कर्डिलेंची कन्या सुवर्णा कोतकरांना अटकपूर्व जामीन