UP Assembly Election: अखिलेशच्या नेतृत्वात भाजपच्या विरोधात लढणार शरद पवार

भाजपच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडल्याने त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा खेळ संपला असून आता शेवटच्या जोड्या घेऊन भाजप निवडणूक लढवत आहे.

UP Assembly Election: अखिलेशच्या नेतृत्वात भाजपच्या विरोधात लढणार शरद पवार
up assembly election ncp will contest election against bjp under akhilesh yadav leadership
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 5:12 PM

UP Assembly Election: अखिलेशच्या नेतृत्वात भाजपच्या विरोधात लढणार शरद पवार

उत्तर प्रदेशात होणा-या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं दिसतंय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असून विधानसभेच्या निवडणूकीत कोण बाजी मारेल याकडे देशाचे लक्ष लागले आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव (Akhilesh yadav) यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असं जाहीर केल्यापासून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सध्या भाजप (Bjp) सत्तेत आहे, परंतु त्यांच्या राष्ट्रासाठीच्या कल्पना चांगल्या नाहीत. त्यामुळे भाजप एक वेगळा विचार जनतेमध्ये रूजवत असून तो देशाच्या हिताचा नाही अशा पध्दतीची टीका शरद पवारांनी भाजपवरती केली आहे.

भाजपच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडल्याने त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा खेळ संपला असून आता शेवटच्या जोड्या घेऊन भाजप निवडणूक लढवत आहे. जेव्हापासून भाजपचे कार्यकर्त्ये इतर पक्षात प्रवेश करीत आहेत म्हणजे हा एक बदल आहे. हे फक्त युपी पुरतं मर्यादीत नसून अनेक राज्यांमध्ये सुध्दा अशीचं परिस्थिती आहे. तसेच सत्तेत असलेला भाजप कधी सामान्य माणसांचा विचार करतो की नाही अशी मला सुध्दा शंका असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

अखिलेश नेतृत्वात असं असेल नियोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचं वरीष्ठ नेतृत्व नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखिलेशच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात निवडणुक लढवणार असल्यााची घोषणा केली आहे. त्याचबरोबर युपीमध्ये प्रत्येक दिवशी अनेक भाजपचे कार्यकर्त्ये इतर पक्षात प्रवेश करीत असल्याचे सुध्दा त्यांनी आवर्जुन सांगितले. यावरून असं लक्षात येतंय की, योगी सरकार किती अहंकारी होती. मलिक यांनी एका विशेष वर्गाचा अन्याय केल्याचं सुध्दा म्हणटलं आहे. भाजपचा पराभव निश्चित असल्याने कार्यकर्त्यांची इतर पक्षाला पसंती असल्याचे सुध्दा मलिक यांनी स्पष्ट केले.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिलेश यांच्यात उमेदवारी सीट निश्चित करण्यावरून बोलणी सुरू आहे. एक सीट फायनल झाली असून इतर सीटची बोलणी सुरू आहे. आम्ही खरंतर भाजपला हरवण्यासाठी अखिलेशला मदत करत असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले. युपीमध्ये शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून त्यांनी बिगर भाजप पक्ष्यांना मदत करण्याचं ठरवलं आहे. तसेच शिवसेना जर निवडणुक एकटी लढत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. परंतु आम्ही अखिलेशच्या नेतृत्वात निवडणूक लढतोय असं नवाब मलिक यांनी जाहीर केलं.

UP Assembly Election: काँग्रेसच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर; बलात्कार पीडीतेच्या आईला तिकीट

UP Assembly Election: भाजपच्या 14 तासांच्या बैठकीनंतर पहिल्या तीन टप्प्यांसाठी 172 उमेदवारांची यादी फायनल

संजय राऊत आणि टिकेत यांच्यात काय चर्चा? निवडणुकीत कुणाला पाठिंबा? टिकेत म्हणतात…

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.