संजय राऊत आणि टिकेत यांच्यात काय चर्चा? निवडणुकीत कुणाला पाठिंबा? टिकेत म्हणतात…

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी टिकेत यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कारण सध्या पाच राज्यात निवडणुका (Elections 2022) आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे आणि अशातच होणाऱ्या या भेटीत काय घडलं? दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत तर्क लावले जात आहेत.

संजय राऊत आणि टिकेत यांच्यात काय चर्चा? निवडणुकीत कुणाला पाठिंबा? टिकेत म्हणतात...
SANJAY RAUT AND RAKESH TIKAIT

दिल्लीतच्या सीमेवर वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर शेतकरी नेते राकेश टिकेत (Rakesh tiket) देशभर गाजले. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होत पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी टिकेत यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कारण सध्या पाच राज्यात निवडणुका (Elections 2022) आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे आणि अशातच होणाऱ्या या भेटीत काय घडलं? दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत तर्क लावले जात आहेत, संजय राऊत यांच्याशी भेट झाल्यानंतर राकेश टिकेत यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली, राऊत यांच्या भेटीत काय झालं? आगामी निवडणुकांबाबत त्यांची भूमिका काय? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. हे दोन नेते भेटत आहेत म्हटल्यावर राजकीय चर्चा झाली असणार असे सर्वांनाच वाटत असताना राकेश टिकेत यांनी कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याचे सांगितले आहे.

टिकेत यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण

संजय राऊत आणि माझ्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच आगामी निवडणुकीबाबत त्यांना विचारले असता, आम्ही निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याचा आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. दिल्लीत वर्षभराच्या आसपास ठाण मांडून बसलेले राकेश टिकेत आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्याचा किमान पंजाबमधील मतदारांवर तर मोठा परिणाम झाला असता, मात्र टिकेत यांच्या या भूमिकेने अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत.

केंद्र सरकराने गेल्या वर्षी तीन नवे कृषी कायदे पास केले, त्याला देशभरातून मोठा विरोध झाला, दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा देत, हा मुद्दा लावून धरला. सर्वात जास्त काळ दिल्लीच्या वेशीवर देशाचा अन्नदाता बसून राहिल्यानंतर केंद्र सरकारने गुडघे टेकत तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर राकेश टिकेत आणि आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीची सीमा सोडली आणि घरी परतले. या आंदोलनात सर्वात जास्त सहभाग हा पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा होता. आता पंजाबमध्ये निवडणुकांचे बिगूल वाजले आहे, त्यामुळे टिकेत कुणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, मात्र त्यांनी कुणालाही पाठिंबा देत नसल्याची भूमिका घेतली आहे.

Rakesh Tikait | राऊतांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट, महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण, शिवसेना नेमकं काय करु पाहतेय ?

Punjab Election: फोन करा आणि पंजाबचा मुख्यमंत्री ठरवा!! आम आदमी पार्टी प्रमुख केजरीवाल यांचे जनतेला आवाहन

Goa Elections: राहुल गांधी सकारात्मक, पण गोवा स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय? राऊतांची प्रपोजल मांडलं

Published On - 2:27 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI