Rakesh Tikait | राऊतांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट, महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण, शिवसेना नेमकं काय करु पाहतेय ?

संजय राऊत यांनी संयुक्त किसान मोर्चाचे सर्वेसर्वा तथा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेतली. ही भेट झाल्यानंतर खुद्द राकेश टिकैत यांनी मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे टिकैत यांनी सांगितले आहे. ते टिव्ही 9 शी बोलत होते.

Rakesh Tikait | राऊतांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट, महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण, शिवसेना नेमकं काय करु पाहतेय ?
SANJAY RAUT AND RAKESH TIKAIT

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेनेने (Shivsena) उडी घेतली आहे. येथे शिवसेना 50 ते 100 जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच राजकीय गणितं जुळवण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी संयुक्त किसान मोर्चाचे सर्वेसर्वा तथा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेतली. ही भेट झाल्यानंतर खुद्द राकेश टिकैत यांनी मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे टिकैत यांनी सांगितले आहे. ते टिव्ही 9 शी बोलत होते.

टिकैत यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण  

“आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्ही निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही,” अशी प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली आहे. याआधी संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच राकेश टिकैत कोणत्याही नेत्याला भेटत नाहीत. तसेच ते राजकारणात सहभागी होत नाहीत. तरीदेखील ते मला भेटत आहेत, असे राऊत यांनी सांगितले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये दुपारी भेट झाली. या भेटीचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली ?

संजय राऊत आणि राकेश टिकैत यांच्यात मुझफ्फरनगर येथे भेट झाली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. फक्त उद्धव ठाकरे यांनी टिकैत यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

शिवसेना अयोध्या, मथुरेतून उमेदवार देणार 

दरम्यान, शिवसेना उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केलेला आहे. बलिदान दिलेलं आहे. अयोध्येचं आंदोलन थंड पडलेलं असताना, उद्ध ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन वेळा तिथे गेलो. नंतर या विषयला चालना मिळाली. सध्या कोर्टाच्या आदेशाने तिथे मंदिर उभं राहत आहेत. अयोध्येत तसेच मथुरा या मतदार संघातही आमचा उमेदवार असेल. काही लोक आमच्याकडे आले होते. मथुरेत काही प्रश्न आहेत. त्यामुळे शिवसेनेचा प्रचार मथुरा येथून व्हावा अशी काही लोकांची इच्छा आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत मी मथुरेत जाणार आहे. तेथील लोकांना भेटणार आहे,” असे संजय राऊत यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

इतर बातम्या :

Punjab Election: फोन करा आणि पंजाबचा मुख्यमंत्री ठरवा!! आम आदमी पार्टी प्रमुख केजरीवाल यांचे जनतेला आवाहन

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पंतप्रधानांची आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, उद्धव ठाकरे यांच्यावतीनं राजेश टोपे आढावा मांडणार

Maharashtra News Live Update : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक, काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसकडून तिकीट


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI