जेव्हा कुंपणच शेत खातं…! ICU बेडसाठी आरोग्य कर्मचाऱ्याकडून 1 लाख 80 हजारांची मागणी

| Updated on: May 18, 2021 | 10:22 AM

एका आरोग्य कर्मचाऱ्याने ICU बेड मिळवून देण्यासाठी 1लाख 80 हजाराची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Health worker demand money from covid patient)

जेव्हा कुंपणच शेत खातं...! ICU बेडसाठी आरोग्य कर्मचाऱ्याकडून 1 लाख 80 हजारांची मागणी
फोटो प्रातनिधिक
Follow us on

नाशिक : एकीकडे कोरोना रुग्णांचा वाढता कहर, दुसरीकडे औषधांचा तुटवडा, तर तिसरीकडे अपुऱ्या आरोग्य सुविधा, यामुळे सर्वत्र हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी बेड उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली लूट चालू आहे. नुकतंच एका आरोग्य कर्मचाऱ्याने ICU बेड मिळवून देण्यासाठी 1लाख 80 हजाराची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या जुन्नर तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Health worker demand 1 lakh 80 thousand from covid patient for ICU bed)

नेमकं काय घडलं? 

नाशिकच्या सिन्नर येथे एकाच कुटुंबातील दोन भाऊ आणि आई कोरोनाग्रस्त आहे. त्यांना ICU बेडची गरज होती. यामुळे त्यांच्या एका नातेवाईकांनी आळे येथील नातेवाईकांच्या माध्यमातून आळेफाटा येथे बेड मिळेल या आशेने संपर्क सुरु केला. त्यावेळी जुन्नर तालुक्यातील आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात अमोल पवार उपस्थित होता. मेडिकल फार्मासीस असलेल्या अमोल पवारने 1 लाख 80 हजार रुपये द्या, बेड मिळवून देतो असे सांगितले.

घरातील रुग्णांना बेडची अत्यंत गरज असल्याने त्यांनी तात्काळ अमोल पवार यांच्या अकाऊंटवर पैसे जमा केले. यानंतर त्या कोरोनाग्रस्त कुटुंबियांना पिंपरी चिंचवडच्या सरकारी न्यू भोसरी हॉस्पिटलचे ICU बेड उपलब्ध झाले. मात्र त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात दोन भाऊ आणि आईचा समावेश आहे.

सरकारी कर्मचारी स्वत:चे खिसे भरण्यात व्यस्त

एकीकडे कोरोनाच्या काळात जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या अत्यंत वाईट काळात सरकारकडून जनतेला मदतीची अपेक्षा आहे. मात्र दुसरीकडे सरकारी कर्मचारी रुग्णांच्या कुटुंबियांच्या अडचणींचा फायदा घेऊन स्वत:चे खिसे भरत आहेत.

आरोपीकडून गुन्हा कबूल

दरम्यान आळे येथील आरोग्य कर्मचारी अमोल पवार याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीने तो गुन्हा कबूल केला आहे. सध्या पोलीस बेड मिळून देण्यासाठीची अजून कोणती साखळी कार्यरत आहे का? याचा तपास घेत आहेत. (Health worker demand 1 lakh 80 thousand from covid patient for ICU bed)

संबंधित बातम्या : 

नाशिकमध्ये लहान मुलांना कोरोनाचा विळखा, मनपा लस खरेदी करण्याच्या तयारीत

कोरोनाचा विळखा सैल, म्युकरमायकोसिसचा कहर वाढता, मालेगावात ब्लॅक फंगसने तिघांचा बळी

एकीकडे रुग्णांची तडफड, दुसरीकडे 60 व्हेंटिलेटर धूळखात, नाशिकमध्ये गलथानपणाचा कळस