नाशिकमध्ये लहान मुलांना कोरोनाचा विळखा, मनपा लस खरेदी करण्याच्या तयारीत

केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाची लस मिळत नसल्याने नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी हा निर्णय घेतला आहे. (Nashik Children Corona patient)

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यापाठोपाठ नाशिक मनपानेही लस खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाची लस मिळत नसल्याने नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी हा निर्णय घेतला आहे. (Nashik Small Children Corona patient increase Municipal corporation Preparing to buy the vaccine)

सर्वपक्षीय बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब 

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नाशिककरांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना लस मिळत नाही, असा दावा नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलवण्यात आली आहे. नाशिक महापालिकेकडून स्वत:च कोरोना लस खरेदी करण्याचा विचार सुरु आहे. या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्राने ऑगस्टपर्यंत लसीचे डोस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यापूर्वी या लसीची खरेदी केली जात असेल तर ती करावी अशी सूचना आयुक्तांनी दिली आहे.

लहान मुलांना कोरोनाचा विळखा 

तर दुसरीकडे नाशिकमध्ये लहान मुलांना कोरोनाचा विळखा बसत आहे. नाशिक महापालिकेच्या ठक्कर डोम कोव्हिड सेंटरमध्ये 7 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याशिवाय नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयात लहान कोरोनाबाधित मुलाचं दाखल होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे प्रशासनाचे आरोग्य विभागाला सतर्कतेचा आदेश दिला आहे.

इंजेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीला नोटीस

तसेच नाशिकमधील मायलन कंपनीला महापालिकेकडून लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे. या कंपनीने नाशिक पालिकेकडून 60 लाख रुपये आगाऊ रक्कम घेऊनही इंजेक्शन देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप करण्यात येत आहे. तर अटी शर्ती मोडून मनपाचे इंजेक्शन खुल्या बाजारात विकणाऱ्या गेट वेल कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली आहे. (Nashik Small Children Corona patient increase Municipal corporation Preparing to buy the vaccine)

संबंधित बातम्या :  

जन्म एकत्र, मृत्यू एकत्र; 24 व्या वाढदिवशी कोरोना संसर्ग, जुळ्या भावांचा पाठोपाठ मृत्यू

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरण्याचे संकेत, बाधितांच्या संख्येत मोठी घट

एन. डी. पाटील कोरोनामुक्त, वयाच्या 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI