AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एफडीए अडचणीत? आधी मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एक साधा कीटकही नसल्याचा दावा, आता सापडल्या चक्क..

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून मंत्रालयाची कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते.

मोठी बातमी! एफडीए अडचणीत? आधी मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एक साधा कीटकही नसल्याचा दावा, आता सापडल्या चक्क..
एफडीए आणि वकिलांकडून मंत्रालयाच्या कँटीनची तपासणी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 31, 2026 | 4:17 PM
Share

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून मंत्रालयाची कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयातील कॅटीन तपासण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान मंत्रालयातील दोन्ही कँटनीमध्ये माश्या आढळून आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणात आता थोड्याच वेळात हाय कोर्टासमोर अहवाल मांडला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणात न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्यासमोर थोड्याच वेळात पुन्हा सुनावणी होणार आहे.

तपासणीमध्ये काय आढळलं? 

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कीटक नाही म्हणणे हस्यास्पद आहे,  असं म्हणत हाय कोर्टाकडून मंत्रालयाची कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच या संदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करण्यास देखील सांगण्यात आलं होतं.  कोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कँटीनची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये दोन्ही कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या आहेत. तसेच भाज्या कापण्यासाठी आणि इतर बाबींसाठी वापरण्यात येणारे चाकू देखील अत्यंत जुनाट आणि गंजलेल्या अवस्थेत असल्याचं आढळून आला आहे.

कोर्टासमोर अहवाल सादर करणार 

दरम्यान मंत्रालयाची कँटीन तपासण्यात आली आहे, हाय कोर्टाच्या आदेशानुसार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कँटीनची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आता हा अहवाल हाय कोर्टात सादर केला जाणार आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्यासमोर थोड्याच वेळात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर आता कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान त्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उच्च न्यायालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कँटीनची तपासणी केली होती, त्यामध्ये कँटीन चालवण्यासाठी अत्यावशक परवाने नसल्याचं आढळून आलं होतं,  त्यामुळे ही कँटीन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता मंत्रालयाच्या कँटीनची देखील तपासणी करण्यात आली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा