मला नक्षलवादी व्हायचंय, हवालदिल शेतकऱ्याचं हिंगोली तहसीलदाराकडे निवेदन

| Updated on: Feb 25, 2021 | 2:55 PM

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी (Hingoli Farmer Asked Permission To Became Naxalite) नक्षलवादी होण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे.

मला नक्षलवादी व्हायचंय, हवालदिल शेतकऱ्याचं हिंगोली तहसीलदाराकडे निवेदन
Hingoli Farmer
Follow us on

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी (Hingoli Farmer Asked Permission To Became Naxalite) नक्षलवादी होण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. तसे निवेदनच त्यांनी सेनगाव तहसीलदारांकडे दिलंय (Hingoli Farmer Asked Permission To Became Naxalite).

शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असून प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पतंगे यांनी दिलेल्या निवेदनातून केलाय. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. शेतकऱ्याचं नुकसान होऊन ही पीक विमा मिळत नाही. कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नसल्याचा आरोप या शेतकऱ्याने केलाय.

शासकीय यंत्रणेला याबाबत काही विचारणा केली असता, शासकीय यंत्रणा मात्र 353 कलमान्वये शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करतो, अशा धमक्या देत असल्याचंही त्यांनी या निवेदनातून म्हटलंय. शेतकऱ्यांचे आंदोलने उपोषण मागण्यांकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा गंभीर आरोप या शेतकऱ्याने केलाय.

शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या योजनांची नीट अंमलबजावणी होत नसल्याचा या शेतकऱ्याचा आरोप आहे. कोरोना आणि अतिवृष्टीमुळे काहीही पिकलं नसतांना शेतीची वीज तोडण्याचा धडाका सर्वत्र सुरु आहे. याबाबत प्रशासनाकडे किती ही विनंत्या, तक्रारी अर्ज केले तरी त्याची प्रशासन दखल घेत नाहीये. त्यामुळे मायबाप मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना नक्षलवादी बनण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्याने सरकारकडे केलीये.

Hingoli Farmer Asked Permission To Became Naxalite

संबंधित बातम्या :

हिंगोलीत गुढ आवाजाची मालिका, भूकंपाचे सौम्य धक्के, मराठवाड्याच्या पोटात काय घडतंय?

हिंगोलीच्या शेतकऱ्याची कमाल; दुष्काळी पट्ट्यात पपईचे विक्रमी उत्पादन, कमावला लाखोंचा नफा