हिंगोलीत गुढ आवाजाची मालिका, भूकंपाचे सौम्य धक्के, मराठवाड्याच्या पोटात काय घडतंय?

वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी ह्या तीन तालुक्यात गुढ आवाज येत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केल्यात. (earthquake hingoli basmat district)

हिंगोलीत गुढ आवाजाची मालिका, भूकंपाचे सौम्य धक्के, मराठवाड्याच्या पोटात काय घडतंय?

हिंगोली : मराठवाड्यातल्या हिंगोली (hingoli) जिल्ह्याचा काही परिसर गुढ आवाजानं हादरुन गेला आहे. वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी ह्या तीन तालुक्यात गुढ आवाज येत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केल्यात. पण हा आवाज नेमका कशाचा आहे याचा उलगडा मात्र अजून झालेला नाही. (earthquake in hingoli and basmat district)

वसमत तालुक्यात सौम्य भूकंपासह आवाज !

वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे गावात कालपासून काही वेळेस गुढ आवाज आला आहे. रिश्टर स्केलवर 3.2 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. यात मनुष्यहाणी झालेला नाही पण एका घराची भींत पडल्याची प्राथमिक माहिती आहे. काल शनिवारी दुपारच्या वेळेत दिवसभरात दोन वेळेस पांगरा शिंदे गावात गुढ आवाज आले. त्यानं भयभीत होऊन गावकरी रस्त्यावर आले होते. प्रशासनही ह्या आवाजानं सतर्क झालं आहे.

पांगरा गावात पुन्हा पुन्हा आवाज!

पांगरा शिंदे गावात भूगर्भातून आवाज येण्याची ही काही पहिली वेळ नाही. आतापर्यंत शंभर वेळेस तरी असा आवाज आल्याची माहिती गावकरी देतात. हा आवाज नेमका कशाचा आहे याचा शोध घेण्यासाठी जवळच्याच स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूगर्भतज्ञ भेट देऊन गेले पण त्यांनाही ठोस असा काही उलगडा झाला नाही. पण या आवाजामुळे फक्त वसमतच नाही तर कळमनुरी, औंढा नागनाथ ह्या तालुक्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

कळमनुरीतल्या गावातही आवाज

कळमनुरी तालुक्यातल्या पोतरा गावातही असेच जमीनीखालून आवाज येत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणनं आहे. गेल्या आठवड्यात(18 जाने.) रिश्टर स्केलवर सौम्य भूकंपाची नोंदही केली गेली आहे. डिसेंबर महिन्यात तर 4 वेळेस असे आवाज झाल्याचं गावकऱ्यांनी तक्रार केली आहे. सौम्य भूकंपाच्या धक्क्यात एका शेतकऱ्याची विहिर कोसळली आहे. पण इतर कुठली जीवितहाणी झालेली नाही.

पुण्यातही भूकंपाची नोंद

गेल्या मंगळवारी पुणे जिल्ह्यातही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.6 इतकी नोंदवली गेली आहे. पुरंदर तालुक्यात 7 वा. 28 मिनिटांनी हा धक्का जाणवला. त्याचं केंद्र पुरंदरमध्येच 12 कि.मी. खोलमध्ये असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं दिली.

संबंधित बातम्या :

इंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू

Karnataka Shivamogga blast : कर्नाटकातील भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू, महाभयंकर स्फोटाने जमीन हादरली

दिल्लीला पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिक घाबरले

(earthquake in hingoli and basmat district)