Karnataka Shivamogga blast : कर्नाटकातील भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू, महाभयंकर स्फोटाने जमीन हादरली

Karnataka Shivamogga blast : कर्नाटकातील भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू, महाभयंकर स्फोटाने जमीन हादरली
कर्नाटक स्फोट

कर्नाटकातील शिवमोगा इथं दगडखाणीजवळ (Karnataka Shivamogga blast) भीषण स्फोट झाला. या विद्ध्वंसक स्फोटात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

सचिन पाटील

|

Jan 22, 2021 | 11:59 AM

बंगळुरु : कर्नाटकातील शिवमोगा इथं दगडखाणीजवळ (Karnataka Shivamogga blast) भीषण स्फोट झाला. या विद्ध्वंसक स्फोटात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरुपासून जवळपास साडेतीनशे किमी अंतरावरील शिवमोगा इथं गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली. ट्रकमधून जिलेटिन कांड्या आणि स्फोटकं वाहून नेताना हा महाभयंकर स्फोट झाला. ही स्फोटकं खाणकामासाठी नेली जात होती. (Karnataka Shivamogga blast)

हा स्फोट इतका भयंकर होता की, आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे प्रशासनाने भूगर्भ तज्ज्ञांशीही संपर्क साधला. स्थानिक पोलिसांनी हा भूकंप नसून हंसूर परिसरात स्फोटकांचा ब्लास्ट झाल्याचं सांगितलं.

दरम्यान, या स्फोटातील सर्व मृत हे बिहारचे रहिवाशी होते. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर अफवांचा पाऊस

या स्फोटानंतर सोशल मीडियावर मेसेजचा महापूर आला. या मेसेजमधून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शिवमोगाचे जिल्हाधिकारी शिवकुमार (Shivamogga District Collector KB Shivakumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हुनासोडू गावाजवळ रेल्वे क्रशर साईटवर जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. (dynamite blast at a railway crusher site in Hunasodu village) यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवमोगा शहरापासून ५-६ किमी अंतरावर हा स्फोट झाला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला.

स्फोटाच्या आवाजाने लोक घरातून बाहेर 

हा स्फोट इतका भयंकर होता की अनेक लोक धावत घरातून बाहेर आले. काहींना हा भूकंपाचा झटका वाटला तर काहींना स्फोट. नेमकं काय घडलंय हे कुणालाच कळत नव्हतं.

संबंधित बातम्या  

कर्नाटकच्या भाजप सरकारवर पुन्हा ‘सीडी’चं संकट?; 15 आमदार बंडाच्या तयारीत?

महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें