AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागेश्वर बाबाला कोल्हापूरी चपलेने मारा अन् 1 लाख 51 हजार मिळवा, कुणी केली घोषणा?

Bageshwar Baba : बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर धाराशिव, पुणे, हिंगोली, मालेगाव आणि अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले. तसेच बागेश्वर बाबाला चपलेने मारणाऱ्याला 1.51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बागेश्वर बाबाला कोल्हापूरी चपलेने मारा अन् 1 लाख 51 हजार मिळवा, कुणी केली घोषणा?
Baba BageshwarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 27, 2026 | 3:31 PM
Share

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते की, ‘छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाहीय. तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा.’ यानंतर शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

बागेश्वर बाबाला चपलेने मारणाऱ्याला बक्षीस

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबाच्या विरोधात धाराशिव मध्ये शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. जो कोणी बागेश्वर बाबाला कोल्हापूरी चपलेने मारेल त्याला धाराशिवच्या शिवप्रेमींनी 1 लाख 51 हजारांचे बक्षीस जाहीर केल आहे. धारशिव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी शिवप्रेमींनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन करुन बागेश्वर बाबाच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.

हिंगोलीसह पुण्यातही आंदोलन

हिंगोलीतील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवप्रेमींकडून बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षपार्य विधान केल्याच्या निषेधार्थ बागेश्वर बाबांची प्रतिमा जाळत निदर्शने करण्यात आली. तसेच पुणे शहरातही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. बागेश्वर बाबा यांच्यावर कडक कारवाईच्या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

मालेगावातही शिवप्रेमी आक्रमक

बागेश्वर बाबा व संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवप्रेमींनी मालेगावात निदर्शने केली. शिवप्रेमींकडून दोघांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिली आहे. संबंधित व्यक्तींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन तीव्र करणार असही आंदोलकांनी म्हटले आहे.

अमरावतीत प्रहार आक्रमक

अमरावतीत प्रहारकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रहार जनशक्ती पक्षाकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. निषेध असो, निषेध असो ढोगी बाबांचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शास्त्री यांच्याकडून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली जात आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक कण्यात यावी अशी मागणी यावेळी प्रहार पक्षा कडून करण्यात आली.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...