मोठी बातमी! पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी, प्रशासनाचा निर्णय

पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पावसाचा देण्यात आलेला इशार लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी, प्रशासनाचा निर्णय
palghar district school holiday
| Updated on: Sep 28, 2025 | 7:30 PM

Palghar District School Holiday : सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. हाताशी आलेला खरीप हंगाम पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्र याच अतिवृष्टीच्या संकटातून सावरलेला नसताना आता पुढच्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. हीच बाब लक्षात घेता आता पालघर जिल्हा प्रशासनाने पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पावसाचा देण्यात आलेला इशार लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

सर्वच शाळांना सुट्टी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे गरज असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढच्या काही तासांत पावसाचा हा जोर वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी शाळेत जाण्यची गरज नाही.

दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पालघल जिल्ह्याला 28 आणि 29 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या भागातील नदी, नाले, तलाव तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूलही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शाळेत जाताना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये तसेच विद्यार्थ्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांला कोणता अलर्ट

पुढच्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळा अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, रायगड जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा या जिल्ह्यांना तसेच कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात यलो अर्लट जारी करण्यात आला आहे.