AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा

सोलापूरच्या माळशीरसमध्ये भीषण अपघात घडला आहे, पिकअर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा
Solapur accidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 8:37 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील माळशीरसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पिकअप कोसळून हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या विहिरीत हा पिकअप कोसळला ती विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेली होती. लोकांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने या अपघातात आठ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल.’  असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे हे पिकअप विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आठही जण  पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील रहिवासी होते. ते म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना हा अपघात झाला आहे. तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम