पिंजऱ्यात माणूस आणि दोन वाघ… नागपूरच्या प्राणीसंग्रहालयात सर्वांचाच उडाला थरकाप? त्या व्यक्तीचं काय झालं?

नागपूरातील महाराज बाग प्राणी संग्रहालयातील वाघांच्या पिजऱ्यात एक इसम शिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाने या प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षेतील त्रूटी उघड झाल्या आहेत.

पिंजऱ्यात माणूस आणि दोन वाघ... नागपूरच्या प्राणीसंग्रहालयात सर्वांचाच उडाला थरकाप? त्या व्यक्तीचं काय झालं?
men enter in tiger cage
| Updated on: Jul 31, 2025 | 4:18 PM

नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात एक विचित्र घटना घडली आहे. वाघाच्या पिंजऱ्यात एक व्यक्ती शिरल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या पिंजऱ्यात दोन वाघ असताना हा व्यक्ती आत शिरला कसा असा सवाल निर्माण झाला आहे. या पिंजऱ्यांची उंची १८ फूट इतकी मोठी असतानाही ही व्यक्ती आत कशी गेली हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपुरातील महाराज बाग प्राणी संग्रहालयातील एका पिंजऱ्यात एक इसम आत गेल्याने खळबळ उडाली. यामुळे प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या पिंजऱ्यात दोन वाघ, चार अस्वल,चार बिबटे आणि कोल्हे असे हिंस्र प्राणी होते. हे प्राणी असतानाही हा इसम कसा काय १८ फूटी पिंजऱ्याची भिंत ओलांडून आत शिरला याचे कोडे प्रशासनाला पडले आहे. या प्रकरणातील जी माहीती समोर आली आहे, त्यामुळे पिंजऱ्यातील सुरक्षा रामभरोसे असल्याचे उघडकीस आले आहे.

पिंजऱ्यात शिरलेली व्यक्ती सुमारे अर्धा तास वाघाच्या पिंजऱ्यात होती. सकाळी जेव्हा या प्राणी संग्रहालयाचे सुरक्षारक्षक आले त्यावेळी त्यांना वाघाच्या पिंजऱ्यात माणूस शिरल्याचे पाहून त्यांची पाचावर धारण बसली.त्यांना तातडीने पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर या व्यक्तीला अखेर कसेबसे या वाघाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले. यामुळे प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेत त्रूटी असल्याचे उघडकीस आले आहे.

ही व्यक्ती प्राणी संग्रहालयातील सुरक्षा व्यवस्था भेदून आत कशी गेली याची आता चौकशी होत आहे. या व्यक्तीने प्राणिसंग्रहालयात प्रवेश मिळवून तो पिंजऱ्यात जाईपर्यंत कोणालीही याचा थांगपत्ता लागला नाही. हा व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे समजते. या व्यक्तीचा या पिंजऱ्यात अर्धा तास वावर होता. परंतू याच वेळी नेमके वाघ त्यांच्या नाईटशेल्टरमध्ये आराम करीत होते. त्यामुळे ही व्यक्ती सुदैवाने वाचल्याचे समजते. तरीही या घटनेने प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत. या प्राणी संग्रहालयात एकही गनमॅन नसल्याचे उघडकीस आले आहे.केवळ एक चौकीदार असल्याचे उघडकीस आले आहे. वाघांच्या पिंजऱ्यासाठी चौकीदार,बंदूकधारी गार्ड,पिंजरा अधिक मजबूत करण्याचा प्रस्ताव प्राणी संग्रहालयाने प्रशासनाकडे पाठवला असल्याचे महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बाविस्कर यांनी सांगितले.