तुकाराम मुंढे पुण्यात कसे आले? UPSC कधी केली, हॉस्टेलमध्ये ढेकणांमुळे झोप कशी यायची नाही, सांगितल्या आठवणी…
एफडीएचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे याची नियुक्ती झाल्यानंतर राज्यात असा विभाग आहे याचा नागरिकांना पत्ता लागला. तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात रान उठवले आहे. त्यांची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. त्यात त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पहिल्यांदा सांगितला आहे.

आयएएस तुकाराम मुंढे यांची ‘Unstoppable Tukaram Mundhe’ या शीर्षकाखाली पुण्यात प्रकट मुलाखत घेण्यात आली आहे, त्यात त्यांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा झाला याची सर्व माहिती उपस्थितांना सांगितली. तुकाराम मुंढे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास आणि युपीएससीची तयारी आणि हॉस्टेलचे दिवस या सर्वांवर या मुलाखतीत भाष्य केले आहे. त्यांनी पुण्यातील आपला शैक्षणिक प्रवास सांगितला आहे.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीत तुकाराम मुंढे म्हणतात की बीए झाल्यावर एमएला प्रवेश घेण्यासाठी आपण पुण्याला बसने आलो होतो. त्याआधी आपण पुण्यात कधीही आलेलो नव्हतो. शिवाजी नगर बस स्टँडला उतरल्यावर आपण पायीच चालत विद्यापीठात गेलो. राज्यशास्त्राच्या विभागात प्रवेश घेण्यासाठी गेलो. तिथे जो प्रशासकीय स्टाफ होता. त्यांना अर्ज दिला. तर ते म्हणाले, प्रवेश मिळेल, पण होस्टेल मिळणार नाही. मी म्हटलं, मी दुसरीकडे राहू शकत नाही. मी त्यांना चार पाच हॉस्टेलची नावे सांगितली. ते म्हणाले, बुक आहेत. मग त्यांनी मला एसपी कॉलेजला जायला सांगितल्याचे मुंढे यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे म्हणाले की मी एसपी कॉलेजला प्रवेशासाठी अर्ज केला. पण हॉस्टेलमध्ये प्रवेशाची चिंता होती. त्यानंतर संध्याकाळी मी बसने घरी गेलो. त्यानंतर प्रवेश मिळाल्याचं काहीच कळलं नाही. त्यामुळे मी मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेच यूपीएससी करता करता एमएही केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी मी होस्टेलला किती होतो, प्रवेश मिळणार की नाही हे प्रश्न विचारले नाही. मनात द्वंद्व होतं. मी कुटुंबा व्यतिरिक्त एकटा कधी राहिलेलो नव्हतो. मनात अनामिक भीती मनात होती. राहणार कसा? घरापासून दूर राहायचं कसं? ही भीती मनात होती. मी यूपीएससीची तयारी केली. जयकर लायब्ररीत अभ्यास केला. पुणे विद्यापीठात एक मित्र राज्यशास्त्रात एमए करत होता. मी त्याच्या रुममध्ये पॅरासाईट म्हणून राहत होतो. तिथे गेल्यावर पाहिलं की ढेकणं भरपूर होते. झोपच येत नव्हती. मी म्हटलं, अरे ढेकणं भरपूर आहेत. हे सांगितलं असतं तर आलोच नसतो.
लोक म्हणतात चायनीज फूडवर कारवाई करा
नंतर एमपीएससी करताना फर्ग्युसन रोडवरच्या रानडे लायब्ररीत मी अभ्यास केला. पुणे विद्यापीठात चायनीज गाड्या असायच्या. पाषाण रोडला. मी विचार केला. तिथे जाऊन पाहावं का? माझं पहिलं चायनीज फूड मी तिथे खाल्लं. पण तोपर्यंत मला चायनीज फूड माहीत नव्हतं. आता भरपूर चायनीज फुडला डिमांड आहे. मी काही कारवाया केल्या. लोक म्हणतात आता चायनीज फूडवर कारवाई करा म्हणतात. आता पुढं लक्ष द्यायचं आहे असेही तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले.