माझी एफडीएच्या आयुक्त पदावरून बदली झाली नाही, तुकाराम मुंढे यांनी का केले ट्विट?

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपली एफडीएचे आयुक्त म्हणून बदली झाली नसल्याचे ट्विट केले आहे.

माझी एफडीएच्या आयुक्त पदावरून बदली झाली नाही, तुकाराम मुंढे यांनी का केले ट्विट?
| Updated on: Oct 13, 2026 | 12:44 AM

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपली एफडीए मधून बदली झाली नसल्याचे ट्विट करीत म्हटले आहे. तुकाराम मुंढे यांना MPSC पेपर फुटी प्रकरणात समितीचे सचिव म्हणून काल अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. काही वेबसाईटवर त्यांचा एमपीएससीचे सचिव म्हणून उल्लेख केला होता, त्यामुळे कदाचित त्यांनी हे स्पष्टीकरण दिले असल्याचे म्हटले जात आहे.

येथे ट्वीट वाचा –

Loading...

पुणे येथे एमपीएससीचे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला काल मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एमपीएससीच्या चौकशी समितीचे सचिव म्हणून आयएएस तुकाराम मुंढे काम पाहातील असे म्हटले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष करण्यात आला. या समितीच्या अध्यक्ष पदी निवृत्त मुख्य न्यायाधीश  दिलीप भोसले, माजी न्यायाधीश पी.डी. नाईक, सेवानिवृत्त सचिव गणेश पाटील, पोलिस महानिरीक्षक ( कायदा आणि सुव्यवस्था ) लखमी गौतम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीचे वृत्त देताना काही वेबसाईट यांनी तुकाराम मुंढे हे एमपीएससीचे सचिव म्हणून बातमी चालविली होती. त्यामुळे अनेकांना आता तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन विभागातून बदली झाल्याचे वाटले. त्यावरुन गैरसमज दूर करण्यासाठी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मी अन्न आणि औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे असे एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us