घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली FDA ची जोरदार कारवाई सुरू आहे. मात्र, नुकताच तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर मोठी टीका करण्यात आली. तुकाराम मुंढे यांना थेट मोठा धक्का देण्यात आला.

घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 25, 2026 | 1:47 PM

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. अनेकांकडून त्यांचे काैतुक केले जात आहे .मात्र, राज्यातील एका बड्या सनदी अधिकाऱ्याला तुकाराम मुंढे यांच्या कारवाया पचनी पडत नाहीयेत. माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी अनेक प्रश्न यादरम्यान उपस्थित केले. महेश झगडे यांनी नुकताच एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये ते तुकाराम मुंढे यांच्यावर टीका करताना दिसले. महेश झगडे यांनी आपल्या कार्यकाळाचे उदाहरण देत म्हटले की, आम्ही प्रसिद्धीवर भर न देता प्रत्यक्षात सुधारणा घडवून आणण्यावर लक्ष दिले. कारवाईच्या अतिरेकामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. नियमानुसार, सुरूवातीला सुधारणा नोटीस देणे अपेक्षित आहे. त्यानंतर जर त्रुटी पूर्ण झाल्या नाही तर परवाना निलंबित करता येतो, नियमाप्रमाणे.

पुढे महेश झगडे यांनी म्हटले की, या धाडीमुळे व्यावसायिकांची बदनामी होते. हेच नाही तर तोतया एफडीए अधिकारी बनून खंडणी उकळली जाते. पुण्यातील आस्थापनाचा 98 टक्के अनुपालन अहवाल असतानाही त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. माझ्या कार्यकाळात मी अनेक सुधारणा नोटिस पाठवल्या, काही प्रमाणात परवाने निलंबित केले.

पण कधीच माझ्या कारवाईवर ताशेरे ओढण्यात आली नाहीत. माझ्या कार्यकाळात मी नियमाला धरून काम केले. मला एक सांगा जर आपल्या स्वयंपाक घरात झुरळ दिसले म्हणजे आपण संपूर्ण स्वयंपाक घरच कायमचे बंद करतो का? त्याची स्वच्छता करतो ना… तसेच अन्न सुरक्षा कायद्याचेही तसेच आहे. अन्न सुरक्षा कायद्याचा हेतू व्यवसाय बंद करणे नाही.

तुकाराम मुंढे यांचे नाव न घेता महेश झगडे यांनी टीका केली. मी आयुक्त असताना माझ्या खिशातून 36 हजार रूपये टॅक्सीवर खर्च होत होते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे केली जात होती, ज्यावर मी कारवाई करत होतो. या कारवाईचा धसका दुकानदारांनी घेतला होता. पण माझ्या कोणत्याच कारवाईवर कोर्टाने ताशेरे ओढले नाहीत, ही वस्तू स्थिती आहे. तुकाराम मुंढे यांच्यावर नाव न घेता टीका महेश झगडे यांनी केली.

Follow Us