‘मराठा आरक्षणासाठी राजे एकत्र आलेत; मग अठरापगड जातीचे मावळे गोळा करुन ओबीसी आरक्षण वाचवू’

| Updated on: Jan 30, 2021 | 6:12 PM

महाराष्ट्रात आरक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. अठरापगड जातींचं आरक्षण हडप करण्याचा त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला. | Prakash Shendge

मराठा आरक्षणासाठी राजे एकत्र आलेत; मग अठरापगड जातीचे मावळे गोळा करुन ओबीसी आरक्षण वाचवू
महाराष्ट्रात आरक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. अठरापगड जातींचं आरक्षण हडप करण्याचा त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला.
Follow us on

सांगली: फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच सर्व राजे एकटवणार असतील तर आम्हीदेखील अठरापगड जातीचे मावळे जमवून ओबीसी आरक्षणाचे रक्षण करु, असे वक्तव्य ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केले. (Prakash Shendge on OBC Reservation)

ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत संबंधितांना इशारा दिला. महाराष्ट्रात आरक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. अठरापगड जातींचं आरक्षण हडप करण्याचा त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसीच्या कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आमचे आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव आखला जात आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. त्यामुळे आता यावर काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

’13 टक्के मराठा समाजासाठी इतरांचे हाल’

राज्यात सर्व 75 टक्के नोकरभरतीच्या प्रक्रिया थांबल्या आहेत. ओबीसी समाजाच्या नोकऱ्यांवर आणि हक्कावर गदा आणली जात आहे. 13 टक्के मराठा बांधवांसाठी 87 टक्के एससी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातील नागरिकांचे हाल सुरु असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं आणि टिकवलं; पण हे सरकार खोडा घालतंय: शिवेंद्रराजे

कुणी मान्य करा अथवा नका करू. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय, अशी टीका छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती.

साताऱ्यात आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. या फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते.

यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. राठा आरक्षणावर सरकारचं लक्ष नाही. कोर्टात यांचा वकील उपस्थित राहत नाही. हे सर्व जाणीपूर्वक केल्यासारखं वाटतंय. उद्या मराठा समजात उद्रेक झाला तर त्याला थांबवणार कोण?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या:

सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं आणि टिकवलं; पण हे सरकार खोडा घालतंय: शिवेंद्रराजे

(Prakash Shendge on OBC Reservation)