AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Monsoon : एल निनोचा मान्सूनवर कब्जा, राज्यात या भागात सर्वात कमी पाऊस; नव्या अंदाजाने समोर मोठं संकट!

सध्या मान्सून राज्यभरात पोहोचत आहे. मुंबई, कोकण परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. वातावरणात गारवा जाणवत आहे. मान्सून सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग व्यापून टाकतो आहे. मान्सून हा दाक्षिण कोकण आणि सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात अगोदरच दाखल झाला आहे.

IMD Monsoon : एल निनोचा मान्सूनवर कब्जा, राज्यात या भागात सर्वात कमी पाऊस; नव्या अंदाजाने समोर मोठं संकट!
imd monsoon updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2026 | 6:13 PM
Share

Monsoon Update : सध्या महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. यंदाचा मान्सून दर वर्षाच्या तुलनेत उशिराने आला आहे. या वर्षी एल निनोचेही संकट असणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठ पेरणीसाठी चांगल्या पावसाची वाट पाहावी, असे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, आता याच एल निनोचा सर्वात जास्त धोका नेमका कोणाला बसणार? याबाबतचा हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीचे काम हाती घ्यावे, असे सांगितले जात आहे.

मराठवाड्याला सर्वात जास्त फटका

यावर्षी महाराष्ट्रात एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान कमी असणार असल्याचे संकेत भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. याचा सगळ्यात जास्त फटका हा मराड्यालातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. एल निनोमुळे मराठवाड्यात पाऊस कमी असणार असून उन्हाची तीव्रता जास्त असणार आहे. तशी शक्यता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, यासह कमी कालावधीत येणारी पिके शेकाऱ्यांनी घ्यावीत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मान्सूनची व्याप्ती वाढणार

सध्या मान्सून राज्यभरात पोहोचत आहे. मुंबई, कोकण परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. वातावरणात गारवा जाणवत आहे. मान्सून सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग व्यापून टाकतो आहे. मान्सून हा दाक्षिण कोकण आणि सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात अगोदरच दाखल झाला आहे. आणखी दोन दिवसात त्याची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळेच सध्या पाऊसमान कमी असल्याने कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत, असे आवाहन केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेदेखील 15 जूनपर्यंत मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे सांगितले आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी