weather forecast : पुढचे 24 तास धोक्याचे अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी

पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) तब्बल 23 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

weather forecast : पुढचे 24 तास धोक्याचे अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी
IMD Rainfall Forecast
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 7:15 PM

गेल्या दीड महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाकडून शनिवारी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. देशभरात पावसाचा जोर वाढणार असून, 23 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD)वर्तवण्यात आला आहे. पावसासोबतच आणखी एक मोठं संकट देशावर घोंगावत आहे, ते म्हणजे या काळात वाऱ्याचा वेग देखील प्रचंड असणार आहे. प्रती तास 80 कीमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पर्वतीय भागांमध्ये लँडस्लाईडच्या देखील घडना घडू शकतात. या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. ओडिशा, छत्तीसगड, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या राज्यांना पावसाचा हाय अलर्ट

उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विजांचा कडकडाट आणि प्रति तास 80 किमी एवढ्या प्रचंड वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या राज्यातील नागरिकांना या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात गेल्या आठवड्यापासून पाऊस सक्रिय झाला आहे. मात्र या पावसाचे स्वरूप सर्वदूर नसल्यामुळे अजूनही काही भागांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान शनिवारी देखील हवामान विभागाकडून सहा जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. ऑगस्टचा संपूर्ण महिना पाऊसच झाला नव्हता, मात्र आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us