IMD Weather Update : आला रे आला पाऊस आला! 19 राज्यांमध्ये हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज

मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून 19 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, महाराष्ट्राबाबत देखील मोठी बातमी आहे.

IMD Weather Update : आला रे आला पाऊस आला! 19 राज्यांमध्ये हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज
weather update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 6:40 PM

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे, ऑगस्ट महिन्यात पाऊस झालेला नाहीये, पावसात प्रचंड खंड पडल्याने पिकांचा खरीप हंगाम संकटात सापडला आहे, हातात आलेला घास हिरवला जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये एक दिलासादायय बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 31 ऑगस्ट सोमवार रोजी राज्यातील तब्बल 19 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असून, या काळात तासी 50 ते 60 किमी वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलनासारख्या घटना देखील घडू शकतात असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या राज्यांना पावसाचा इशारा

Loading...

बंगालच्या उपसागरामधून वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे देशातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये 19 राज्यांना भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान या काळात वाऱ्याचा वेग देखील 60 किमी प्रतितास इतका राहणार आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्राला दिलासा देणारा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या काळात ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us