दाऊद इब्राहिमलाच्या मुंबईतील घरावर बुलडोझर, पोलिस बंदोबस्तात महापालिकेने..

डॉन दाऊद इब्राहिम याचे घर पाडले जात आहे. थेट दाऊदच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. या कारवाईकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यातच आता पोलिसांनी दाऊदच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. यादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळतोय.

दाऊद इब्राहिमलाच्या मुंबईतील घरावर बुलडोझर, पोलिस बंदोबस्तात महापालिकेने..
Dawood Ibrahim
| Updated on: Nov 19, 2026 | 8:15 AM

मुसाफिरखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळत आहे. मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया इस्टेट येथील मुसाफिरखाना इमारतीवर BMC ने हातोडा चालवला आहे. महापालिकेच्या या कारवाईकडे सर्वांच्या नजरा आहेत. विशेष म्हणजे याच इमारतीशी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जुन्या घराचा संबंध आहे. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांचं हे घर असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पोलिसांनी मोठी बंदोबस्त ठेवला आहे. या घराच्या खाली मशिद आहे. मुसाफिरखाना इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून तिच्या भिंती आणि छत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीला C-1 श्रेणीतील धोकादायक इमारत घोषित करण्यात आलं आहे. कालच महापालिकेने या कारवाईची तयारी पूर्ण केली.

आज या इमारतीच्या पाडकामाला सुरूवात झाली आहे. मात्र, मुसाफिरखाना येथील मशिदीच्या तोडक कारवाईला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांचे परिसरातील प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष आहे.

Loading...

डॉन दाऊद इब्राहिम याचे घर पाडले जात आहे. थेट दाऊदच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. मसिदीला या कारवाईत धक्काही लागू नये, अशी स्थानिकांची मागणी होती. दाऊदचे घर पाडा पण मसिदीला धक्काही लागला नाही पाहिजे म्हणत स्थानिक लोक आग्रमक भूमिका घेताना दिसले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डोंगरी भागातील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर चालला आहे. इथेच दाऊदच घर आणि ऑफिस आहे. यात भागात दाऊद लहानाचा मोठा झाला.

मुळात ही कारवाई एकट्या दाऊदच्या घरावर नाही तर भेंडी बाजार परिसरात असलेली हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही धोकादायक इमारतीवर आहे. ती इमारतच जमीनदोस्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या कारवाईची तयारी सुरू होती. याबाबत बीएमसीने अगोदर नोटीसही दिली होती. अखेर आज सकाळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरूवात करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us